नेपाळला जमलं ते टीम इंडियाला का नाही?

आयसीसी टी २० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची सुरूवात पराभवाने झाली आहे.

Updated: Mar 19, 2014, 07:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ढाका
आयसीसी टी २० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची सुरूवात पराभवाने झाली आहे.
भारताचा श्रीलंकाविरोधात वॉर्म अप सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाला ५ विकेटने पराभव स्वीकारावा लागला.
दुसरीकडे पहिल्यांदाचा वर्ल्डकप क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या नेपाळ टीमने सर्वोत्तम खेळाला सुरूवात केली आहे.
नेपाळने हाँगकाँगला ८० रन्सने हरवून आपली चमक दाखवली आहे.
नेपाळचा कर्णधार पारस खडकाने आपल्या ऑलराऊंडर खेळाच्या जोरावर, स्पिन अटॅक करून हा कारनामा करून दाखवला आहे.
नेपाळने ८० धावांत विजय साजरा केला आहे. टी २० वर्ल्ड कपच्या इतिहासात हा नवव्या नंबरचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.
नेपाळ टीमसाठी हे मोठं यश असल्याचं सांगण्यात येत आहे. पारस खडका आणि आणि सोमपाल कामी यांची फास्ट बोलिंग सुरूवातीला कामी आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.