फेसबुक चॅटिंगला मनाई केल्याने युवतीची आत्महत्या

Last Updated: Wednesday, February 19, 2014 - 14:40

www.24taas.com, झी मीडिया, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातल्या एका युवतीला अखेर फेसबुक चॅटिंगच्या व्यसनाने संपवलं आहे.
गोरखपूरमध्ये फेसबुक चॅटिंगला मनाई केल्याने, एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केलीय.
कॅँट पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आवास विकास कॉलनीतली ही घटना आहे.
२४ वर्षीय सुषमा गोस्वामीने मध्यरात्री फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सुषमा फेसबुकवर चॅटिंग करत होती, तिच्या आईने तिला मनाई केली, तरीही सुषमा चॅटिंग करत होती.
यानंतर तिच्या आईने रागावलं, याचा राग मनात घेऊन, सुषमाने आत्महत्या केली, घटनास्थळी सुसाईट नोटही मिळाली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 19, 2014 - 14:19
comments powered by Disqus