फेसबुकमध्ये आलंय आणखी एक नवीन फीचर

फेसबुकमध्ये आणखी एक नवीन फीचर आलंय ज्याच्या मदतीने यूजर्स आपल्या भावनांना इमोजीच्या मदतीने व्यक्त करु शकणार आहेत. 

Updated: Jan 30, 2016, 09:56 AM IST
फेसबुकमध्ये आलंय आणखी एक नवीन फीचर title=

नवी दिल्ली : फेसबुकमध्ये आणखी एक नवीन फीचर आलंय ज्याच्या मदतीने यूजर्स आपल्या भावनांना इमोजीच्या मदतीने व्यक्त करु शकणार आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुकवर डिसलाइक बटन हवे असल्याची मागणी केली जात होती. मात्र त्याच्याऐवजी फेसबुकने रिअॅक्शन आणलेत. याच्या मदतीने यूजर्स प्रतिक्रिया देऊ शकणार आहेत. लवकरच सर्व यूजर्स हे इमोजी वापरु शकणार आहेत. 

चुकीच्या अथवा न आवडलेल्या पोस्टला डिसलाइक करता यावे यासाठीचा ऑप्शन हवा अशी यूजर्सची मागणी होती. यावर कंपनीने नवनवे इमोजी आणलेत. तुम्ही एखाद्या पोस्टला लाईक करु शकता अथवा इमोजीच्या मदतीने तुमची प्रतिक्रिया देऊ शकता. 

फेसबुकने ६ विविध देशांमध्ये या इमोजींची टेस्ट केल्याची माहिती गेल्यावर्षी फेसबुकने दिली होती. त्यानंतर आता फेसबुकच्या फीचरमध्ये समावेश करण्यात आलाय.