ठाणे दुर्घटना : हात हलवत परतले दादा-बाबा-आबा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री यांनीही घटनास्थळाला भेट दिलीय तीही ओझरती...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 5, 2013, 02:44 PM IST

www.24taas.com, ठाणे
शिळफाट्याजवळील इमारत दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता ४१ वर गेलाय तर ६० जण जखमी आहेत. त्यापैंकी १२ जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री यांनीही घटनास्थळाला भेट दिलीय तीही ओझरती...

यावेळी तिघांनी इमारत कोसळल्याच्या ठिकाणची पाहणी केली. मात्र, घडलेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया देण्यास तिघांनीही नकार दिलाय. काही न बोलताच तिघे मंत्रीमहोदय घटनास्थळाची पाहणी करून निघून गेले. दोषींवर कारवाई केली जाईल, असं त्यांनी म्हटलंय. पण यापैकी कुणीही मृतांच्या नातेवाईकांना किंवा जखमींना कोणत्याही प्रकारच्या मदतीची घोषणा केलेली नाही.
दरम्यान, या इमारतीचे बिल्डर जमीर कुरेशी आणि सलीम शेख यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. हे दोन्ही बिल्डर फरार आहेत. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळातही उमटलेत.