कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर!

कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई मडगांव या मार्गावर लवकरच डबल डेकर ट्रेन दिसण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 9, 2013, 09:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई मडगांव या मार्गावर लवकरच डबल डेकर ट्रेन दिसण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
मुंबई ते मडगाव या मार्गावक रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावर डबल डेकर ट्रेन चालवण्यासंदर्भात रेल्वे प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. डबल डेकर डबे या मार्गावर सुरु करताना उंचीची समस्या येणार नाही, याची चाचपणी रेल्वे प्रशासनाला करावी करणार आहे. विशेषतः सीएसटीहून ही ट्रेन सुरु केल्यास सीएसटी ते दादर दरम्यान असलेले रेल्वे मार्गावरचे जूने उड्डाणपूल अडथळे ठरणार नाहीत ना? याची तपासणी करावी लागणार आहे.
हे तांत्रिक अडथळे दूर झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.