नवीन वॉचमन ठेवताय?... सावधान!

वॉचमनची नोकरी करत सहा महिने किवा वर्षभरात मालकाचा विश्वास संपादन करायचा आणि मग त्याच्याच घरावर डल्ला मारायचा, अशी धक्कादायक मोडस ऑपरेंडी आहे नेपाळी वॉचमनच्या एका टोळीची... कल्याणमध्ये नुकताच हा प्रकार उघडकीस आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 10, 2013, 10:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
वॉचमनची नोकरी करत सहा महिने किवा वर्षभरात मालकाचा विश्वास संपादन करायचा आणि मग त्याच्याच घरावर डल्ला मारायचा, अशी धक्कादायक मोडस ऑपरेंडी आहे नेपाळी वॉचमनच्या एका टोळीची... कल्याणमध्ये नुकताच हा प्रकार उघडकीस आलाय.
काही दिवसांपूर्वी कल्याणच्या सिंडीकेट परिसरात राहणारे संजय गुप्ता कामानिमित्त परिवारासह शहराबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरी चोरी झाली. गुप्तांनी घरात सीसीटीव्ही बसवले होते त्यामुळे चोर कोण हे सहज समजू शकलं आणि गुप्ता यांना मोठा धक्का बसला. कारण, त्यांचा वॉचमन भरत उर्फ बखत थापानंच चोरी केली होती आणि तो पसार झाला होता. चायनीज गाड्यांवर काम करणाऱ्या नेपाळींकडे पोलिसांची चौकशी सुरू झाली आणि अशा चोऱ्या करणाऱ्या वॉचमनची टोळीच असल्याचं समोर आलं. नागपूर आणि डोंबिवलीमधून एकाला अटक करण्यात आलीय. टोळीचा म्होरक्या किशोर कालूसिंग याच्याकडे मुद्देमाल होता आणि तो नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली. अजूनही ज्यानं गुप्तांच्या घरात चोरी केली तो बखत थापा फरार आहे.
वॉचमन कामावर ठेवताना त्याची संपूर्ण माहिती घ्या आणि संबंधित पोलीस स्टेशनलाही कळवा, असं आवाहन पोलिसांनी केलंय. सहा महिने किंवा वर्षभर इमाने इतबारे वॉचमन ची नोकरी करून मालकांचा विश्वास संपदान करायचा आणि मग त्याच घरावर डल्ला मारायचा अशी या टोळीची मोडस ऑपरेंडी आहे. त्यामुळे यापुढे वॉचमन ठेवताना नक्की काळजी घ्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.