मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप नाही- शाहीन

पालघर फेसबुक प्रकरणी शाहीन आणि रीनु या दोघा मुलींची पालघरच्या प्रथमवर्ग न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. शिवाय या प्रकरणात तक्रारदार असलेले शिवसेनेचे सेनेचे शहरप्रमुख भुषण संखे यांचा या दोन्ही मुलींवर कारवाई करण्याची मागणी करणारा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 1, 2013, 11:14 AM IST

www.24taas.com, पालघर
पालघर फेसबुक प्रकरणी शाहीन आणि रीनु या दोघा मुलींची पालघरच्या प्रथमवर्ग न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. शिवाय या प्रकरणात तक्रारदार असलेले शिवसेनेचे सेनेचे शहरप्रमुख भुषण संखे यांचा या दोन्ही मुलींवर कारवाई करण्याची मागणी करणारा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला.
पालघर फेसबुक प्रकरणातील शाहीन धडा आणि रिनु श्रीनिवासन यांच्यावर खटला मागे घेण्यासाठी राज्याच्या पोलीस विभागातर्फे मांडण्यात आलेला क्लोजर सी समर रिर्पोट कोर्टानं ग्राह्य धरुन दोन्ही मुलींची निर्दौष मुक्तता केलीय.
बाळासाहेब ठाकरेंवर आपण केलेल्या स्टेटस अपडेटबद्दल आपल्याला जराही खंत वा पश्चात्ताप नाही, असं मत शाहीन हिने यानंतर मांडलं. बाळासाहेबांच्या निधनानंतर शाहीन हिने फेसबुकवर केलेल्या स्टेटस अपडेमुळे शाहीन आणि तिच्या कुटुंबावर नष्टचर्य ओढावलं होतं.