कोकणासाठी विशेष ट्रेन्स धावणार

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, August 6, 2013 - 23:30

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ९ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
९ ऑगस्टला तसंच १५ ऑगस्ट रोजी रात्री १.०० वाजता सुटणारी गाडी मडगाव ला दुपारी २.१० मिनिटांनी पोहोचेल. मडगाववरून दुपारी २.४० मिनिटांनी सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी ४.१० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
या स्पेशल ट्रेन्स ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेर्णेम, थिवीम, करमाळी आणि मडगांव या स्थानकांवर थांबतील. या ट्रेन्सला १७ कोच असतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 6, 2013 - 23:30
comments powered by Disqus