शिक्षिका विद्यार्थ्याला सांगायची, सेक्स कर नाही तर हत्या करेन!

 ३१ वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत कथित सेक्स केला आणि त्याला सेक्स करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही महिला विद्यार्थ्याची ट्युशन घेत होती.

PTI | Updated: Oct 21, 2014, 03:34 PM IST
शिक्षिका विद्यार्थ्याला सांगायची, सेक्स कर नाही तर हत्या करेन! title=

लुधियाना : ३१ वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत कथित सेक्स केला आणि त्याला सेक्स करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही महिला विद्यार्थ्याची ट्युशन घेत होती.

पिडीत अल्पवयीन मुलगा हा आठवी इयत्तेत शिकत आहे. तो भाड्याच्या घरात राहत आहे. हे घर आरोप करण्यात आलेल्या महिलेल्या वडिलांचे आहे. १४ वर्षीय मुलाला शारीरिक संबध ठेवण्यासाठी त्याच्यावर ही महिला दबाव आणला. जर माझ्याशी तू संबंध ठेवले नाहीस तर तुला ठार मारीन, अशी ती धमकी देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

या महिलेने मुलाचा एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओचा वापर करून अल्पवयीन मुलाला ती ब्लॅकमेल करीत होती. हा प्रकार अनेक महिने सुरु होता. त्यानंतर या मुलाने आपल्या वडिलांच्या कानावर ही माहिती घातली. त्यानंतर सर्व प्रकार वडिलांनी पोलिसांना सांगितला.

 पोलिसांनी  बाल संरक्षण व लैंगिक शोषण कायदा, 2012 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संबंधित व्हिडिओ जप्त केला आहे. दरम्यान, ही शिक्षक महिला फरार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.