अॅपलचा ५ सी मोबाईल खूपच स्वस्त

अॅपलने आपला हॅन्डसेट आयफोन - ५ सी याची किंमत अधिक कमी करण्याचा निर्णय घेतला गेलाय. रिटेल स्टोअर्समध्ये अॅपलचा हा हॅन्डसेट २२,९९० रुपयांना मिळणार आहे.

Updated: Jan 17, 2015, 05:52 PM IST
अॅपलचा ५ सी मोबाईल खूपच स्वस्त title=

मुंबई : अॅपलने आपला हॅन्डसेट आयफोन - ५ सी याची किंमत अधिक कमी करण्याचा निर्णय घेतला गेलाय. रिटेल स्टोअर्समध्ये अॅपलचा हा हॅन्डसेट २२,९९० रुपयांना मिळणार आहे.

आयफोन - ५ सी हा ८ जीबी मेमरीच्या फोनची ही किंमत आहे. ऑफरनुसार काही रिटेल स्टोअर्समध्ये या मोबाईलवर डिस्काऊंट्स (सूट) मिळेले. आयफोन - ५ सी खरेदी केलेल्या ग्राहकांना २१०० रुपयांचे गिफ्टकार्ड ईएमआय डिल्सवर मिळू शकते. ही ऑफर २२ जानेवारीपर्यंत आहे. ही ऑफर १२ महिन्यांच्या EMI डिल्सवर निवडलेल्या क्रेडिट कार्ड्सवर मिळेल. हे गिफ्ट कार्ड ६, ९ और १२ महिन्यांची व्हॅलिडीटी असेल.

आयसीआयसीआय बॅंक क्रेडीट तसेच डेबिट कार्डचा वापर करणाऱ्यांना १० टक्के कॅश बॅक ऑफर मिळाली.. ही कॅश बॅक ऑफर केवळ १४ आणि १५ जानेवारी होती. आयफोन ५ सीवर ही ऑफर अमेजन स्टोअर्सवर उपलब्ध होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.