`स्टाईल`सह धोनीची एन्ट्री!

अशोक लेलँडनं मोठ्या ‘स्टाईल’मध्ये चार चाकी वाहनांच्या बाजारात एन्ट्री घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते ‘स्टाईल’ ही मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) बाजारात नुकतीच लॉन्च करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 8, 2013, 09:22 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अशोक लेलँडनं मोठ्या ‘स्टाईल’मध्ये चार चाकी वाहनांच्या बाजारात एन्ट्री घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते ‘स्टाईल’ ही मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) बाजारात नुकतीच लॉन्च करण्यात आलीय.
साधारणत: सात ते आठ लोकांना बसण्यासाठी पुरेशी जागा असलेली ही गाडी अशोक लेलँड आणि जपानची कार कंपनी ‘निसान’नं एकत्र येऊन प्रत्यक्षात आणलीय. निसाननं ही गाडी ‘इव्हालिया’च्या धर्तीवर बनवलीय.
‘स्टाईल’वर इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीही चांगलाच भाळलाय. ‘स्टाईल ही तर अशोक लेलँडची सुरुवात आहे. या कारची आपली स्वत:ची अशी स्टाईल आहे... आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाडीची किंमत आणि मायलेजही महत्त्वपूर्ण आहे’ असं धोनीनं उद्घाटनप्रसंगी म्हटलंय.
‘स्टाईल’ सध्या केवळ डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार, एका लीटर डिझेलमध्ये कार १९.५ किलोमीटरचा मायलेज देऊ शकेल. याशिवाय कारच्या मागच्या सीटवर एसी कंट्रोलसारखे फिचर्सही उपलब्ध आहेत. यामुळे मागे बसलेल्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होईल. भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन या कारची निर्मिती केली गेलीय.

‘अशोक लेलँड’ आणि ‘निसान’ या जॉईंट व्हेन्चरमध्ये ही दुसरी गाडी बाजारात दाखल झालीय. याच गाडीनं जपानमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवलीय. ‘स्टाईल’ची किंमतही भारतीय उपभोक्त्यांना समोर ठेऊनच ठरवण्यात आलीय, असंही कंपनीनं म्हटलंय.
‘स्टाईल’ भारतीय बाजारात साडे सात लाख ते नऊ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.