६ मिनीटांत करा स्मार्टफोन फुल्ल चार्ज, सोबत मिळवा ७ दिवसांचा बॅकअप

स्मार्टफोन यूजर्स नेहमी बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याच्या समस्येनं त्रस्त असतात. एकीकडे मल्टी-टास्किंग स्मार्टफोन आणि दुसरीकडे डेटा कनेक्शन जो फोन लवकर डिस्चार्ज करतो. मात्र आता स्मार्टफोन यूजर्सची ही समस्या लवकर संपणार आहे.

Updated: Aug 25, 2015, 07:36 PM IST
६ मिनीटांत करा स्मार्टफोन फुल्ल चार्ज, सोबत मिळवा ७ दिवसांचा बॅकअप title=

मुंबई: स्मार्टफोन यूजर्स नेहमी बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याच्या समस्येनं त्रस्त असतात. एकीकडे मल्टी-टास्किंग स्मार्टफोन आणि दुसरीकडे डेटा कनेक्शन जो फोन लवकर डिस्चार्ज करतो. मात्र आता स्मार्टफोन यूजर्सची ही समस्या लवकर संपणार आहे.

बीजिंगमध्ये रिसर्चनंतर एक नवी बॅटरी बनवली गेलीय, त्यांचा दावा आहे की, अवघ्या ६ मिनीटांमध्ये ० ते १००% पर्यंत स्मार्टफोन चार्ज करू शकतो. तसंच एका ब्रिटिश कंपनीनं हायड्रोजनची बॅटरी बनवलीय. जी स्मार्टफोन्सला तब्बल ७ दिवस बॅटरी बॅकअप देण्यात समर्थ असल्याचा दावा कंपनीनं केलाय.

आणखी वाचा - सावधान! आपला पॅटर्न लॉक सेफ नाही 

या बॅटरीमध्ये टायटेनियम डायऑक्साइडला अॅल्युमिनियमच्या चारही बाजूंना लावलंय. जी बॅटरीच्या निगेटिव्ह इलेक्ट्रॉडसारखं काम करेल. कंपनीच्या मते यात असलेलं लिथियम बॅटरीच्या तुलनेत चार पट जास्त कॅपॅसिटी असेल.

आणखी वाचा - Leaked:11 सप्टेंबरपासून सुरू होणार आयफोन 6s, आयफोन 6s प्लसची

हा शोध अॅल्युमिनियममध्ये जुनी लिथियम बॅटरी ठेवून केला गेला. त्यानंतर हा निष्कर्ष पुढे आला. अॅल्युमिनियम एक हाय कॅपेसिटीचं मटेरिअल आहे. मात्र चार्जिंग आणि डिस्चार्जिंगसोबत ते  संकुचित होतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.