दहावी सीबीएसईचा निकाल २७ मे रोजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता १० वीचा निकाल २७ मे २०१५ रोजी जाहीर होण्याची  शक्यता आहे.

Updated: May 22, 2015, 07:18 PM IST
दहावी सीबीएसईचा निकाल २७ मे रोजी title=

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता १० वीचा निकाल २७ मे २०१५ रोजी जाहीर होण्याची  शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सर्वच क्षेत्रातील निकाल कार्यालयनी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. मात्र, सीबीएसईकडून अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या वर्षी २ मार्च रोजी सीबीएसईचे दहावीच्या परीक्षा सुरु होऊन २६ मार्च रोजी प्रक्रिया पूर्ण झाली. या वर्षी सुमारे १३ लाख ७३ हजार ८५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ८.१ लाख विद्यार्थी तर ५.५ लाख विद्यार्थीनींचा समावेश आहे.

गेल्या वर्षीच्या तुलने याचे प्रमाण ३.३७ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी १३ लाख २० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 

देशातील १४०४७ सीबीएसई शाळांमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात देशभरात ३५३७ परीक्षा केंद्रे होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.