...तर तुमचंही फेसबुक पेज होईल ब्लॉक!

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर जर तुमचं ‘फॅन पेज’ असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... तुम्ही जर कोणताही विचार न करता काहीही पोस्ट करत असाल तर सावधान!

Updated: Aug 28, 2014, 03:47 PM IST
...तर तुमचंही फेसबुक पेज होईल ब्लॉक! title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर जर तुमचं ‘फॅन पेज’ असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... तुम्ही जर कोणताही विचार न करता काहीही पोस्ट करत असाल तर सावधान!

यापुढे, तुम्ही जर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केलात तर तुमच्या बेजबाबदारपणामुळे फेसबुक तुमचं पेज ब्लॉक करू शकतं. जे यूजर्स, कंपन्या, ऑर्गनायझेशन आणि पब्लिक फिगर आपलं प्रोडक्ट खपवण्यासाठी किंवा थर्ड पार्टीच्या प्रोडक्टचं प्रमोशन आपल्या पेजवरून करत असतील तर अशांना फेसबुक ब्लॉक करतंय.

या पद्धतीच्या अॅक्टिव्हिटीजना फेसबुक ‘प्रमोशनल आणि मार्केटिंग अॅक्टिव्हिटी’ म्हणून गणना करतंय. म्हणजेच तुम्ही तुमच्या पेजवर इतर व्यक्तीचं प्रोडक्ट प्रमोट करत असाल तर यासाठी फेसबुक तुमचं पेज ब्लॉक करू शकतं. 

महत्त्वाचं म्हणजे, फेसबुक तेव्हाच एखादं अकाऊंट ‘डिअॅक्टिव्ह’ किंवा पेज ब्लॉक करतं जेव्हा एखादी व्यक्ती खोट्या नावानं आपलं ‘फेक अकाऊंट’ बनवतात आणि किंवा खूप वेगवेगळ्या ग्रूपशी स्वत:ला जोडतात किंवा या फेक अकाऊंटवरून एकाच वेळेस खूप जास्त फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जातात किंवा आपल्या पेजचा वापर केवळ मार्केटिंगसाठी किंवा भडकाऊ कन्टेन्ट पाठवण्यासाठी करतात.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.