किबोर्ड... फोल्ड करा... आणि सहजच कुठेही कॅरी करा!

तुमच्याकडे फोन किंवा टॅब आहे... आणि त्यावर तुम्हाला एखादं काम तातडीनं पूर्ण करायचंय... पण, टाईप कसं करणार...? या गॅझेटसनाही एखादं छोटंसं आणि सोबत अगदी आरामात कॅरी करता येईल, असं किबोर्ड असतं तर किती बरं झालं असतं ना! असा साहजिकच विचार तुमच्या मनात आला असेल... हीच तुमची गरज ओळखलीय 'एलजी' या कंपनीनं...

Updated: Aug 28, 2015, 03:48 PM IST
किबोर्ड... फोल्ड करा... आणि सहजच कुठेही कॅरी करा! title=

मुंबई : तुमच्याकडे फोन किंवा टॅब आहे... आणि त्यावर तुम्हाला एखादं काम तातडीनं पूर्ण करायचंय... पण, टाईप कसं करणार...? या गॅझेटसनाही एखादं छोटंसं आणि सोबत अगदी आरामात कॅरी करता येईल, असं किबोर्ड असतं तर किती बरं झालं असतं ना! असा साहजिकच विचार तुमच्या मनात आला असेल... हीच तुमची गरज ओळखलीय 'एलजी' या कंपनीनं...

एलजीनं 'रॉली किबोर्ड' नावाचा एक फोल्डेबल वायरलेस किबोर्ड लॉन्च करण्याची घोषणा केलीय. हा किबोर्ड तुम्ही सहज कुठेही नेऊ शकता... 

अधिक वाचा - याहूचं वेदर अॅप पावसाची १५ मिनिटं आधी सूचना देणार

येत्या महिन्यात बर्लिनच्या एका ट्रेड शो 'आयएफए २०१५'मध्ये हा किबोर्ड लॉन्च होणार आहे. हा किबोर्ड चार फोल्डमध्ये गुंडाळला जाऊ शकतो. गुंडाळल्यानंतर तो एखाद्या छोट्या काठीप्रमाणे होईल. जो तुम्ही सहजच बॅगमध्ये कॅरी करू शकता.

यावर तुम्ही सहज टाईपही करू शकता. कारण कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे याचे बटन्स १७ MM चे आहेत.... म्हणजेच डेस्कटॉप किबोर्डपेक्षा थोडं छोटं.... डेस्कटॉप किबोर्ड १८ MM असतात. 

अधिक वाचा - ६ मिनीटांत करा स्मार्टफोन फुल्ल चार्ज, सोबत मिळवा ७ दिवसांचा बॅकअप

 

किबोर्ड एकाच वेळी दोन डिव्हाईसला कनेक्ट केला जाऊ शकतो.... हा वायरलेस किबोर्ड ब्लूटूथ ३.० सपोर्ट करेल. 

यामध्ये सिंगल AAA बॅटरी लावण्यात आलीय. त्यामुळे जवळपास तीन महिन्यांपर्यंत तुम्ही हा किबोर्ड चार्ज न करता वापरू शकता.

अधिक वाचा - १६ वर्षाच्या मुलाने बनवलं गुगलपेक्षाही सर्वोत्कृष्ट सर्च इंजीन

या किबोर्डची किंमत वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी असेल.... सप्टेंबर महिन्यात अगोदर अमेरिकेत लॉन्च केल्यानंतर तो इतर ठिकाणीही हळू-हळू उपलब्ध होईल. 

 

हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही की बोर्डच्या प्रेमात पडाल...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.