रिलायन्स जिओची आजपासून नवी मोफत ऑफर

रिलायन्स जिओने आपली नवी ४ जी योजना आजपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 'हॅप्पी न्यू ईअर' या नावाने नव्या ग्राहकांना  उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आजपासून जे युजर जिओची सेवा घेतलील त्यांच्यासाठी ४ महिने इंटरनेट डेटा मोफत असणार आहे.

Updated: Dec 4, 2016, 09:59 AM IST
रिलायन्स जिओची आजपासून नवी मोफत ऑफर title=

मुंबई : रिलायन्स जिओने आपली नवी ४ जी योजना आजपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 'हॅप्पी न्यू ईअर' या नावाने नव्या ग्राहकांना  उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आजपासून जे युजर जिओची सेवा घेतलील त्यांच्यासाठी ४ महिने इंटरनेट डेटा मोफत असणार आहे.

रिलायन्स जिओच्या ४जी सुविधेच्या माध्यमातून मोफत कॉलिंग, मोफत व्हाईस कॉलिंग आणि मोफत रोमिंग सुविधा मिळणार आहे.

३१ मार्च २०१७ पर्यंत ही मोफत सेवा राहणार आहे. त्यामुळे नव्या युजर्ससाठी ४ महिने मोफत सेवा मिळणार आहे.

दरम्यान, १ जानेवारी २०१७पासून जुन्या ग्राहकांना ही मोफत सेवा मिळणार आहे. त्यामुळे त्यांची ६ महिने मोफत सेवा होईल.

जिओ 'हॅप्पी न्यू ईअर' या ऑफरसाठी ग्राहकाला सिम घेण्यासाठी काही डॉक्युमेंट्स बरोबर केवासी प्रॉसेस पूर्ण करावी लागेल. ही प्रोसेस पूरी केल्यानंतर आपले जिओ सिम सुरु होईल.