पाहा: गॅजेट्सचे साईड इफेक्ट्स…

‘तू जहां-जहां चलेगा मेरा साया साथ होगा...’कधी आपण आपल्या सोबत्यासाठी गायलं जाणारं हे गीत आता आपल्या फॅव्हरेट गॅजेट्ससाठी गाऊ लागलोय. गॅजेट्सशिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाच करवत नाही. मात्र लक्ष ठेवा हे गॅजेट प्रेम तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतं. 

Updated: Jul 6, 2014, 04:50 PM IST
पाहा: गॅजेट्सचे साईड इफेक्ट्स… title=

मुंबई : ‘तू जहां-जहां चलेगा मेरा साया साथ होगा...’कधी आपण आपल्या सोबत्यासाठी गायलं जाणारं हे गीत आता आपल्या फॅव्हरेट गॅजेट्ससाठी गाऊ लागलोय. गॅजेट्सशिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाच करवत नाही. मात्र लक्ष ठेवा हे गॅजेट प्रेम तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतं. 

मोबाईल आणि टॅबलेट
जर सर्वात जास्त वापरात येणाऱ्या गॅजेटबाबत म्हटलं तर मोबाईलचं नाव सर्वात पहिले येतं. मोबाईलसोबत टॅबलेटचं प्रमाण मोठं आहे. अशात मोबाईल प्रेमाची जास्त चिंता करण्याची गरज नाही. 

हे आहेत साइड इफेक्ट्स 

  • डोळे लाल होणं आणि डोळ्यांची आग होणं  
  • मान आणि कमरेचं दुखणं

 

डोळ्यांचा त्रास होऊ शकतो सुरू

मोबाईल आणि टॅब सतत पाहत राहिल्यानं डोळ्यांमधील ओलेपणा कमी होत जातो, ज्यामुळं डोळ्यांची आग आणि डोळे लाल होण्याची समस्या होऊ शकते. याप्रकारच्या समस्येला कंप्युटर व्हिजन सिंड्रोम म्हटलं जातं. डोळ्यांमध्ये असलेला रेटिना खूप मुलायम आणि चिकट असतो. ज्यावर नेहमी आर्द्रतेची लेअर असते. जेव्हा आपण कोणत्याही स्क्रीनकडे सतत पाहतो तेव्हा डोळ्यांची ही आर्द्रता संपते आणि रेटिनाचाही. अशानं डोळे लाल होतात आणि  दुखतात. तसं तर प्रत्येक गॅजेट डोळ्यांना नुकसानाच पोहोचवतं. मात्र मोबाईल आणि टॅबची स्क्रीनची साईज 4-5 इंचाहून कमी असेल तर ते डोळ्यांसाठी जास्त नुकसानकारक असतं.  

सुरक्षेचे उपाय

-आपले डोळे दर मिनिटाला 13-14 वेळा पापण्या मिटतात. मात्र जेव्हा आपण मोबाईल आणि टॅबमध्ये स्क्रीनवर पाहण्यात मशगूल असतो तेव्हा पापण्या मिटण्याची प्रक्रिया कमी होत 5-8 प्रति मिनिट अशी होते. म्हणून कोणत्याही स्क्रीनकडे बघतांना पापण्या जाणूनबुजून 12-13 वेळा बंद कराव्यात. 

- स्क्रीन जितकी लहान असते डोळ्यांवर तेवढाच जास्त ताण येतो. म्हणून लहान आणि कमी रिझॉलूशन (352x240)हून कमी स्क्रीनवर जास्त स्ट्रेस टाकतो. 

- मोबाईल किंवा टॅबवर सतत 70-100 शब्द एकाच वेळी वाचल्यास डोळे खराब होऊ शकतो. 

- कधीही मोबाईल किंवा टॅबवर 5 मिनिटांहून अधिक वेळा वाचू नये. 

- मोबाईल किंवा टॅबला डोळ्यांच्या अगदी जवळ (1 फूटाहून कमी) जवळ वापर करू नये. 

मान आणि खांद्याचा होऊ शकतो त्रास 

डोकं वाकून सतत मोबाईल आणि टॅबच्या स्क्रीनवर आपली नजर असते. त्यामुळं मानेचं दुखणं वाढतं. अनेक जण नेहमी आपला खांदा आणि मानेच्यामध्ये फोन ठेवून कामं करता करता बोलतात. त्यामुळं त्यांच्या मानेला खूप नुकसान होतं. त्यामुळं हे टाळावं, मोबाईल आणि टॅबचा वापर करतांना मानेला सरळ ठेवावी. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.