तुमच्या मुलाची शालेय प्रगती आता तुमच्या मोबाइलवर

तुमचा मुलगा शाळेत काय करतो, त्याची हजेरी किती, खेळात कसा आहे याची माहिती तुम्ही शाळेत गेल्यावरच तुम्हांला कळते पण आता ही सर्व माहिती तुम्हांला तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. 

Updated: Jan 8, 2015, 07:04 PM IST
तुमच्या मुलाची शालेय प्रगती आता तुमच्या मोबाइलवर title=

नवी दिल्ली : तुमचा मुलगा शाळेत काय करतो, त्याची हजेरी किती, खेळात कसा आहे याची माहिती तुम्ही शाळेत गेल्यावरच तुम्हांला कळते पण आता ही सर्व माहिती तुम्हांला तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. 

पाल्याची शाळेतील प्रगती पालकांना नित्यनेमाने कळविण्यात राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगर पालिकांच्या शाळांमध्ये 'दर्पण' योजना नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे़. केंद्रपुरस्कृत या योजनेत महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती देताना राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले, या योजनेतून विद्यार्थ्यांबाबत पालक ते शाळा यांच्यातील दररोज संवाद साधला जाणार आहे.  शाळेतील अनेक विषय पालकांपर्यंत पोहचतच नसल्याने पालकांना पाल्याशी कसे वागावे हे कळत नसते. या योजनेतून विद्यार्थ्यांच्या हजेरीसह त्याच्या प्रगतीचे मूल्यांकन मोबाईल एसएमएसव्दारे पालकांना कळविले जाणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.