एक लीटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणार ही भारतीय कार

टाटानं सर्वात स्वस्त कार टाटा नॅनो बाजारात आणून खळबळ माजवली होती. आता कंपनी आणखी एक धमाका करायला सज्ज आहे. यावेळी कंपनी एक अशी कार लॉन्च करतेय, जी नक्कीच सर्वांच्या मनावर राज्य करेल. कारण टाटा मोटर्स भारतात लवकरच १ लीटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणारी कार लॉन्च करणार आहे. २०१६पर्यंत ही कार बाजारात उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

Updated: Aug 26, 2015, 08:43 PM IST
एक लीटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणार ही भारतीय कार  title=

नवी दिल्ली: टाटानं सर्वात स्वस्त कार टाटा नॅनो बाजारात आणून खळबळ माजवली होती. आता कंपनी आणखी एक धमाका करायला सज्ज आहे. यावेळी कंपनी एक अशी कार लॉन्च करतेय, जी नक्कीच सर्वांच्या मनावर राज्य करेल. कारण टाटा मोटर्स भारतात लवकरच १ लीटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणारी कार लॉन्च करणार आहे. २०१६पर्यंत ही कार बाजारात उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

आणखी वाचा - एसयूव्ही ताफ्यात 'वोल्वो एक्ससी 90' दाखल...

टाटा मेगापिक्सेलच्या रुपात समोर येणारी ही कार दिसण्यातही आकर्षक असेल आणि यात खूप अत्याधुनिक फीचर्स असतील. टाटानं ही कार ८२व्या जिनेव्हा मोटर शोमध्ये प्रदर्शित केली होती. तेव्ही ती एक कॉन्सेप्टच्या रुपात होती. टाटा नॅनो सारखीच ही कार मध्यम वर्गाला नजरेसमोर ठेवून तयार केली गेलीय. चार सीट्स असलेली ही कार पर्यावरणासाठी अनुकूल असेल. कारमधून प्रति किलोमीटर अवघा २२ ग्राम कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होईल. 

टाटा मेगापिक्सेलमध्ये शानदार एक्सटेयिर आणि इंटेरिअर असेल. सोबतच पनारोमिस छप्पर, चार लोकांना बसण्याची जागा आणि टच स्क्रीन ऑल इन वन कमांड सेंटर असेल. या टचस्क्रीनमध्ये एसी, व्हेंटिलेशन, ड्रायव्हिंज मोड परफॉर्मेंस आणि टॅम्प्रेचर कंट्रोल करण्याचे फीचर्स असतील. सोबतच आपण आपला मोबाईलही टच स्क्रीनला कनेक्ट करून हँड्स फ्री मोजवर पण वापरू शकाल. कार पार्क करण्यासाठी पार्क असिस्ट सिस्टम पण असेल.

आणखी वाचा - रोबोटशी सेक्स करणार मनुष्य?

मीडिया सूत्रांनुसार, टाटा मेगापिक्सेल जानेवारी २०१६मध्ये लॉन्च होऊ शकते. कंपनी लॉन्चिंगची तयारी करतेय, कारची किंमत ५ ते ६ लाख रुपयांदरम्यान असेल. टाटा मेगापिक्सेलमध्ये ३२५ सीसी सिंगल सिलेंडरचा वापर केला गेलाय. या कारमध्ये एक लिथियम आयन फास्फेट बॅटरी आणि चालत्या कारमध्ये रिचार्ससाठी पेट्रोल इंजन जनरेटर लागलंय. टाकी फूल केल्यानंतर ही कार एकावेळी तब्बल ९०० किलोमीटरपर्यंत चालवता येईल. कार १०० किमी/लीटर मायलेज देईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.