अजब! कचरापेटीत कचरा फेका आणि मिळवा मोफत Wi-Fi

 स्वच्छेतेसाठी दोन पदवीधर तरुणांनी एक अजब शक्कल शोधून काढलीय. कचरापेटीत कचरा टाकला तर फ्री वायफाय देण्याची घोषणा त्यांनी केलीय. या अभियानाला त्यांनी नाव दिलंय 'वाय-फाय ट्रॅश बिन'.

Updated: Aug 17, 2015, 07:42 PM IST
अजब! कचरापेटीत कचरा फेका आणि मिळवा मोफत Wi-Fi title=

मुंबई:  स्वच्छेतेसाठी दोन पदवीधर तरुणांनी एक अजब शक्कल शोधून काढलीय. कचरापेटीत कचरा टाकला तर फ्री वायफाय देण्याची घोषणा त्यांनी केलीय. या अभियानाला त्यांनी नाव दिलंय 'वाय-फाय ट्रॅश बिन'.

असा मिळेल फ्री वाय-फाय

मुंबईतील प्रतिक अग्रवाल आणि त्याचा सहकारी राज देसाई यांनी एक अभियान सुरू केलंय. प्रतिकनं सांगितलं, जेव्हा कचरापेटीत काही ट्रॅश (कचरा) टाकला जातो तेव्हा कचरापेटीवर एक कोड चमकतो. हा कोड म्हणजे फ्री वाय-फायचा पासवर्ड... प्रतीक आणि राज यांनी डेन्मार्क, फिनलँड, सिंगापूर इत्यादी देशांचा दौरा केला. त्यांना जाणवलं आपल्या आसपास स्वच्छतेसाठी लोकांच्या व्यवहारात बदल करणं आवश्यक आहे.

अशी सुचली कल्पना

प्रतिकनं सांगतिलं, आम्ही फिनलँड, डेन्मार्क, सिंगापूर सारख्या देशांकडून खूप मदत घेतली. एकदा एका संगीत समारंभाला जात असतांना वाय फाय ट्रॅश बिनची कल्पना सुचली. प्रतिक सांगतो आमच्याजवळ कोणतंही नेटवर्क नव्हतं. मग आम्ही आपल्या फोनवरील हॉटस्पॉट्स सुरू करून लोकांना फ्री वाय-फाय दिला.

स्वच्छतेच्या या अभियानासाठी प्रतिक आणि राज यांना त्यांच्या मित्रांनीही मदत केली. एमटीएसकडून त्यांना मदत मिळाली आणि बंगळुरू, कोलकाता आणि दिल्लीत विकेंडला विविध महोत्सवात हे अभियान यशस्वी ठरलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.