वोडाफोनची 4G सेवा डिसेंबरमध्ये सुरू होणार

वोडाफोन इंडियाने येत्या डिसेंबर महिन्यात दिल्ली-एनसीआरपासून 4जी सेवेला सुरूवात करत आहे. चौथ्या पीढीची (4G) मोबाईल दूरसंचार सेवा २०१५ च्या अखेरीस सुरू करणार असं वोडाफोननं आधीच जाहीर केलं होतं. बाजारातील नंबर एकची मोबाईल कंपनी एअरटेलने 4G सेवा सुरू केली आहे. तसेच रिलायन्सनेही आपली 4G सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. 

Updated: Oct 19, 2015, 04:56 PM IST
वोडाफोनची 4G सेवा डिसेंबरमध्ये सुरू होणार title=

मुंबई : वोडाफोन इंडियाने येत्या डिसेंबर महिन्यात दिल्ली-एनसीआरपासून 4जी सेवेला सुरूवात करत आहे. चौथ्या पीढीची (4G) मोबाईल दूरसंचार सेवा २०१५ च्या अखेरीस सुरू करणार असं वोडाफोननं आधीच जाहीर केलं होतं. बाजारातील नंबर एकची मोबाईल कंपनी एअरटेलने 4G सेवा सुरू केली आहे. तसेच रिलायन्सनेही आपली 4G सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. 

दिल्ली-एनसीआरचे प्रमुख अपूर्व मेहरोत्रा यांनी सांगितलं की, 'आम्ही ग्राहकांसाठी 1800 MHz बँडमध्ये 4जी सर्व्हिस डिसेंबरमध्ये सुरू करतोय. यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत. वोडाफोनजवळ दुसऱ्या देशात 4जी सर्विस देण्याचा अनुभव आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये आमची सेवा उत्तम असेल.'

अधिक वाचा : एअरटेल ४जी आणि वोडाफोन ३जी: किंमत आणि प्लानमधील अंतर

व्होडाफोन दिलेल्या माहितीनुसार मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, बंगळुरू आणि कोच्ची येथे 4G नेटवर्क सुरू करणार आहे. तसेच कंपनी सात सर्कलमध्ये 3G सेवा करणार आहे. तसेच इतर १६ सर्कलमध्ये 3G सेवेचा विस्तार करणार आहे. या सात सर्कलमध्ये आसाम, पूर्वोत्तर भारत, उत्तर प्रदेश (पश्चिम), राजस्थान, कर्नाटक, केरळ आणि ओडिशा यांचा समावेश आहे. 

अधिक वाचा : ६ मिनीटांत करा स्मार्टफोन फुल्ल चार्ज, सोबत मिळवा ७ दिवसांचा बॅकअप

4G सेवेचे परीक्षण यशस्वी झाले आहे. आपले नेटवर्क विस्तारीत करण्यासाठी व्हो़डाफोनने पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्यास सुरू केली आहे. यापूर्वी भारती एअरटेलने घोषणा केली होती की पुढील काही आठवड्यात ३०० शहरांमध्ये आपली 4जी सेवा सुरू करणार आहे. 

व्होडाफोनने आतापर्यंत १८ देशांमध्ये आपली 4G सेवा सुरू केली आहे. भारतात कंपनीचे १ लाख ३१ हजार टॉवर आहेत. 

अधिक वाचा : खुशखबर! देशभरात एअरटेलची 4G सेवा सुरू

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.