७ रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि ५ रुपयात अनलिमिटेड डेटा

जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या देखील वेगवेगळे ऑफर देऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. वोडाफोनने एक स्वस्त प्लान लॉन्च केला आहे. ७ रुपयात वोडाफोन टू वोडाफोन अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येणार आहे. याची वॅलिडीटी १ तास असणार आहे.

Updated: Jan 10, 2017, 03:35 PM IST
७ रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि ५ रुपयात अनलिमिटेड डेटा title=

मुंबई : जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या देखील वेगवेगळे ऑफर देऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. वोडाफोनने एक स्वस्त प्लान लॉन्च केला आहे. ७ रुपयात वोडाफोन टू वोडाफोन अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येणार आहे. याची वॅलिडीटी १ तास असणार आहे.

५ रुपयात अनलिमिटेड डेटा

वोडाफोनने सोबतच डेटा प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यामध्ये ५ रुपयात अनलिमिटेड 2G डेटा देण्यात येणार आहे. हा प्लान प्रीप्रेड यूजर्ससाठी असणार आहे, ही ऑफर ९ जानेवारीपासून सुरु झाली आहे.

१६ रुपयात अनलिमिटेड 4G डेटा

वोडाफोनने १६ रुपयात अनलिमिटेड ४जी डेटा लॉन्च केला आहे. याची वॅलिडीटी १ तास असणार आहे.