एका झंझावाताची अखेर

बीड जिल्हातील एक छोटसं गाव नाथ्रा ते देशाची राजधानी नवी दिल्ली.. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राज्याचा उपमुख्यमंत्री, खासदार आणि अखेर केंद्रीय ग्रामिण विकास मंत्री...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 3, 2014, 06:47 PM IST

प्रकाश दांडगे, सिनिअर प्रोड्युसर, झी २४ तास
नाथ्रा ते पुणे एक खडतर प्रवास
बीड जिल्हातील एक छोटसं गाव नाथ्रा ते देशाची राजधानी नवी दिल्ली..
जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राज्याचा उपमुख्यमंत्री, खासदार आणि अखेर केंद्रीय ग्रामिण विकास मंत्री...
एका गरिब शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा ते अवघ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेला लोकनेता...
हा प्रवास आहे गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे नावाच्या एका संघर्षमय व्यक्तिमत्वाचा....
हा प्रवास नियतीच्या एका फटक्यानं संपलाय....
एका उमद्या नेत्याची करुण अखेर झालीय....
१२ डिसेंबर १९४९...
नाथ्रा या गावात एका शेतकरी कुटुंबात गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झाला...
परळी तालुक्यातील हे एक दुष्काळी गाव...
याच गावानं दिला गोपीनाथ मुंडे नावाचा एक झुंझार नेता...
वडिल पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई यांनी परिस्थितीशी संघर्ष करत मुलांना जिद्दीनं शिकवलं... वडिलांचा १९६९ मध्ये मृत्यू झाल्यानंतर मोठे भाऊ पंडितअण्णांनी लहानग्या गोपीनाथला आधार दिला... पुढे शिकवलं...
हाच होता गोपीनाथ मुंडेंचा संघर्षाचा काळ.. याच दिवसांनी त्यांच्यातला लोकनेता घडवला...
सर्वसामान्य कष्टक-याचं दु:ख दुर करण्याची प्रेरणा गोपीनाथ मुंडेंना दिली ती याच संघर्षमय दिवसांनी...
जेमतेम 500 घराचं नाथ्रा गावं...इथल्याच एका झाडाखाली भरणा-या जिल्हा परिषदेच्या शाळेत गोपीनाथ मुंडे शिकले... परिक्षा देण्यासाठी 12 किलोमिटर चालत जावं लागायचं असे ते दिवस गोपीनाथ मुंडेंना नेहमी आठवत असत.. पुढच्या शिक्षणासाठी मग लगानग्या गोपीनाथ मुडेंना परळीच्या जिल्हा परिषद शाळेत पाठवण्यात आलं.. इथं त्याचं अनुभव विश्व अधिक विस्तारलं... परळीच्या आर्य समाज मंदिरात ते नेहमी जात. इथचं विविध धर्मांचा त्यांनी अभ्यास केला. पुस्तकं आणि वर्तमानपत्र वाचनाची गोडी गोपीनाथ मुंडेंना लागली ती परळीतच.
मग मुंडे कॉलेज शिक्षणासाठी अंबाजोगाईत दाखल झाले. इथं ख-या अर्थानं गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाचा जन्म झाला... कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले गोपीनाथ मुंडे विद्यार्थी चळवळीत सक्रीय झाले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनं केली... कॉलेज निवडणुकांमध्येही त्यांनी भाग घेतला पण निवडणुक मात्र लढवली नाही...
अंबाजोगाईतल्या कॉलेज दिवसांमध्येच त्यांची भेट झाली ती प्रमोद महाजन नावाच्या एका उमद्या तरुणाशी... ही साथ पुढे खुप बहरली... प्रमोद महाजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तालुका सचिव होते... हा काळ होता 1970 चा...प्रमोद महाजन यांच्या आग्रहावरुन गोपीनाथ मुंडे नावाचा तरुण संघ परिवारात दाखल झाला आणि ही साथ अखेरपर्यंत टिकली...
विद्यार्थ्यांची आंदोलनं... ग्रामीण भागातील मुलांसाठी संघर्ष... संघांची शिस्त आणि नेतृत्वाची पायाभरणी... गोपीनाथ मुंडें नावाचा नेता आकाराला येत होता...
1971 च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात जनसंघाच्या उमेदवारासाठी गोपीनाथ मुंडे प्रचारात उतरले.. ही त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात होती...गोपीनाथ मुंडे नावाचा हा उमदा तरुण संघ नेतृत्वानं अचुक हेरला होता...गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाला संघाच्या शिस्तीत आकार यायला लागला होता...
1997 मध्ये पुण्यात ऱाष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षा वर्गात मुंडे गेले. इथंचं संघाची विचारधारा, संघाची शिस्त आणि देशसेवेची दिशा गोपीनाथ मुंडेंना मिळाली....
बीड नंतर पुण्यानं गोपीनाथ मुंडेच्या जडणघडणीत मोठा हातभार लावला.. एका ग्रामीण भागातील तरुणाला पुण्यानं नव्या जगाची ओळख करुन दिली... नेतृत्वाला दिशा दिली....
पुण्यातल्याच आयएलएस लॉ कॉलेजला गोपीनाथ मुंडेंनी प्रवेश घेतला. इथंच त्यांची भेट झाली ती विलासराव देशमुख या लातूर जिल्हातील बाभळगावच्या तरुणाशी... पुढे राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी विलासरावांशी कॉलेजमध्ये जुळलेली मैत्री गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर जपली...
पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत असतांनाच संघाच्या कामात मुंडेंचा सहभाग वाढत होता..पुण्यातील मोतीबाग या संघाच्या पुण्यातील मुख्यालयातही गोपीनाथ मुंडे वर्षभर होते. समर्थ शाखेचे मुख्य शिक्षक आणि नंतर चाणक्य शाखेचे कार्यवाह, संभाजी नगर मंडळ कार्यवाह अशी बढती गोपीनाथ मुंडेंना संघात मिळत गेली. याच काळात गोळवलकर गुरुजी, अटल बिहारी वाजपेयी, श्रीपती शास्त्री यांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्वांचा मोठा प्रभाव गोपीनाथ मुंडेंवर पडला..पुण्यातील महाविद्यालयीत तरुणांचे नेतृत