<B> टेक रिव्ह्यू - मायक्रोमॅक्स कॅन्व्हॉस मॅग्नस </b>

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘एक से बढकर एक’ असे प्रोडक्टस बाजारात दाखल होत आहेत. मोबाईल हे सध्याचं हीट प्रोडक्ट... साहजिकच मोबाईल कंपन्यांमध्ये बाजारातील आपलं अस्तित्व धडाक्यात दाखवून देण्यासाठी रेस सुरू आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 23, 2013, 09:36 PM IST


www.24taas.com
प्रणय पालव,
झी मीडिया, मुंबई

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘एक से बढकर एक’ असे प्रोडक्टस बाजारात दाखल होत आहेत. मोबाईल हे सध्याचं हीट प्रोडक्ट... साहजिकच मोबाईल कंपन्यांमध्ये बाजारातील आपलं अस्तित्व धडाक्यात दाखवून देण्यासाठी रेस सुरू आहे. या रेसमध्ये ‘मायक्रोमॅक्स’नं आपली अशी एक गती प्राप्त केलीय. याचाच एक भाग म्हणून या मोबाईल कंपनीनं पुन्हा एक ‘मोबाईल’ लॉन्च केलाय. ‘मायक्रोमॅक्स कॅन्व्हॉस मॅग्नस’ हा १२ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला मोबाईल बाजारात दाखल झालाय.

‘मायक्रोमॅक्स कॅन्व्हॉस मॅग्नस’चे फिचर्स…
> डिस्प्ले : ५ इंचाचा डिस्प्ले (७२० X १२८० पिक्सल रिझोल्युशन)
> प्रोसेसर : १.४ गिगाहर्टझ क्वाड कोअर प्रोसेसर
> रॅम : १ जीबी
> कॅमेरा : १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, एलईडी फ्लॅशसहीत
> पुढचा कॅमेरा : २ मेगापिक्सलचा कॅमेरा
> टेक्नॉलॉजी : अँन्ड्रॉईड ४.२ जेली बीन
> बॅटरी : २००० मेगाहर्टझ बॅटरी
> सीमकार्ड : ड्युएल सीम कार्ड स्लॉट (जीएसम + जीएसएम)

रेटींग (५ पैकी)
> डिझाईन : ४
> डिस्प्ले : ३
> कॅमेरा : ४.५
> परफॉर्मन्स : ३
> सॉफ्टवेअर : ३.५
> बॅटरी लाईफ : ३.५
> व्हॅल्यू फॉर मनी : ३
> ओव्हरऑल : ३
'मायक्रोमॅक्स कॅन्व्हॉस मॅग्नस'ची बाजारातील किंमत आहे, १४,९९९ रुपये
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.