इगतपुरीमध्ये घरात बिबट्याने दिला चार बछड्यांना जन्म

आता मादी बिबट्या बछड्यांना दुसरीकडे घेऊन जाणार की तेथेच राहणार, यावर वनविभागाचे अधिकारी पाळत ठेऊन आहेत. 

Updated: Aug 16, 2020, 08:33 PM IST
इगतपुरीमध्ये घरात बिबट्याने दिला चार बछड्यांना जन्म title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात  बिबटयाचे चार बछडे आढळून आले आहेत. येथील नांदगावसदो गावाजवळ डोंगराच्या पायथ्याजवळ असणाऱ्या एका रिकाम्या घरात मादी बिबट्याने पिल्लांना जन्म दिला. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर बिबट्याच्या भीतीमुळे सध्या परसिरात दहशतीचे वातावरण आहे. 

आता मादी बिबट्या बछड्यांना दुसरीकडे घेऊन जाणार की तेथेच राहणार, यावर वनविभागाचे अधिकारी पाळत ठेऊन आहेत. त्यासाठी घरापासून काही अंतरावर वनरक्षक पहारा देत आहेत. गेल्याच आठवड्यात या परिसरात बिबट्याने एका वृद्ध महिलेला ठार मारले होते. त्यामुळे वनविभाग आणि स्थानिकांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

बिबट्याच्या 'त्या' पिल्लांना मिळाले पालक

 तसेच बछड्यांना सुरक्षित राखण्यासाठी वनविभागाकडून पावले उचलली जात आहेत. मुसळधार पावसामुळे इगतपुरी परिसरातील धबधब्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे या जागा सुरक्षित राहिलेल्या नाहीत. त्यामुळेच मादी बिबट्याने बछड्यांना रिकाम्या घरात ठेवल्याचा अंदाज आहे. हे बछडे साधारण १५ दिवसांचे आहेत.