अमर काणे, झी मीडिया, नागपूर: गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील तीन बिबट्यांच्या पिल्लांना पालक मिळाले आहे. अकोला वनविगातील चार बिबट्याची पिल्ले १६ जुलैपासून आईपासून विभक्त झाली होती. आता ही पिल्ले जवळपास दीड महिन्यांची झाली आहेत. यापैकी तिघांना पालक मिळाले आहे तर एक पिल्लू अजूनही प्रतिक्षेत आहे. दत्तक घेतलेल्या पिल्लांचे मुफासा, हंटर आणि डायना असं नामकरण करण्यात आले आहे.
१६ जुलै २०२० ला आईने सोडून दिल्यामुळे दोन नर व दोन मादी अशा चार बिबट्याच्या पिल्लांना नागपुरातील गोरेवाडा वन्यजीव उपचार केंद्रात आणण्यात आले होते. त्यातील तीन बिबट्यांच्या पिल्लांना पालक मिळाले असून एक बिबट्याच्या पिल्लासाठी वर्षभरासाठी ५० हजार रुपये शुल्क आकारण्यात आलेय .ए.आर कन्स्ट्रक्शनने घेतलेल्या पिल्लाला मुफासा तर डॉ रोशन भिवापूरकर यांन घतेलेल्या बछड्याचे नामकरण डायना असे करण्यात आलेय. तर माजी आमदार आशिष देशमुख यांच्या पत्नी डॉ आयुश्री आशिष देशमुख यांनी हंटर या बिबट पिल्लूची जबाबदारी घेतलीय.तर एक बिबट पिल्लू अजून कुणी दत्तक घेतलेलं नाही.
गोरेवाडा येथील प्राणी दत्तक योजनेअंतर्गत उपलब्ध असलेले वन्यप्राणी
वन्यप्राणी दत्तक घेण्याचे मासिक दर वार्षिक दर
वाघ ३०००० ३,५०,००००
बिबट १३००० १,५०,०००
बिबट पिल्लू - ५०,०००
अस्वल २०००० ७५००००