नवऱ्याला खांद्यावर घेणाऱ्या कारभारणीचा आणखी एक 'विक्रम'

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नवऱ्याला विजय मिळाल्याच्या उत्साहात कारभारणीनं खांद्यावर उचलून जल्लोष साजरा केला होता.

Updated: Jan 28, 2021, 04:23 PM IST
नवऱ्याला खांद्यावर घेणाऱ्या कारभारणीचा आणखी एक 'विक्रम' title=

पुणे : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिंकलेल्या उमेदवारांपेक्षा चर्चा होती कारभारणीची. ग्रामपंचायत निवडणूकीत पतीला विजय मिळाल्याच्या आनंदात चक्क पत्नीनं नवऱ्याला खांद्यावर घेऊन वरात काढली. नेहमी जिंकल्यावर पत्नीला खांद्यावर घेण्याची निवडणुकीच्या निकालाची परंपरा या कारभारणीनं मोडून काढली. या कारभारणीचं तर महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कौतुक होतं आहे. आता याची दखल तर केंद्र सरकारनंही घेतली.

माझा कारभारी लय भारी! असं म्हणत ग्रामपंचायत निवडणूकीतील विजयात पत्नी कारभारणीने आपल्या पती कारभाऱ्याला खांद्यावर उचलून घेतले आणि साऱ्या जगानं कारभारणीचं कौतुक केलं. 

आता याच कौतुकाची दखल केंद्र सरकारच्या डाक विभागाने घेतली आहे. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पाळू गावच्या रेणूका संतोष गुरव या शेतकरी कारभारणीचा पोस्ट तिकीट देऊन सन्मान करण्यात आला.

खेड तालुक्यात रेणूका यांच्या पतीनं विरोधी उमेदवाराचा दारूण पराभव केला. हा आनंद आणि उत्साह साजरा करण्यासाठी त्यांनी चक्क आपले पती संतोष यांना खांद्यावर उचलून घेतलं. 

अनेकदा निवडणूक जिंकल्यानंतर विजयी उमेदवाराला कार्यकर्ते खांद्यावर उचलून घेत जल्लोष साजरा करतात. पण ही परंपरा कारभाणीनं मोडून काढली. कार्यकर्त्यांनी नाही तर पत्नीनंच विजयी पतीला खांद्यावर घेऊन आनंद साजरा केला.