जेव्हा तुम्ही प्रेमात पडता...

Aug 06, 2014, 09:17 AM IST
1/12

ती व्यक्ती तुमच्या जवळ असते तेव्हा तुम्ही खूप आनंदी असता... तुमच्या हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा जोरात धावत असल्याचं तुम्हालाही जाणवेल.  

2/12

तुम्ही त्या व्यक्तीवर किती प्रेम करता हे दाखवून देण्याचा तुमचा सतत प्रयत्न सुरू असतो... आणि समोरची व्यक्ती मात्र कळून न कळल्याचं भासवत असतो. 

3/12

त्या व्यक्तीशी संवाद साधताना तुम्ही त्याच्या वेगवेगळ्या वाक्यांचा अर्थ लावू पाहता... त्याला काय म्हणायचंय हे समजून घेण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करता... (कधी कधी गोष्ट खूप सरळ असूनही)

4/12

जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीला भेटण्याची संधी तुम्हाला मिळते... तेव्हा तुम्ही स्वत:ला खूप वेळा आरशात निरखून पाहता... स्वत:कडे जास्त लक्ष देता... 

5/12

भले, तुम्हाला याअगोदर स्वप्न पडलेली नसोत... किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला स्वप्न लक्षातही राहत नसतील... पण, तुम्ही प्रेमात पडल्यानंतर मात्र दिवसाढवळ्या स्वप्नरंजन सुरु करतात... आणि अर्थातच ते विसरण्याची शक्यताही नाही.

6/12

इतर वेळेस फाल्तू वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही प्रेमात पडल्यानंतर करायला सुरुवात करता... उदाहरण द्यायचंच झालं तर फेसबुक आणि इतर सोशल वेबसाईटवर तुमचे प्रेमाची टक्केवारी दाखवणारे गेम्स... इतर वेळी तुम्ही हे गेम खेळणाऱ्यांकडे 'काय मूर्ख आहे हा' असं पाहता... पण, जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा याच गेमवर तुम्ही तुमच्या प्रेमाचा अंदाज घेता... 

7/12

कुठल्या ना कुठल्या मार्गानं तुम्ही तुमच्या 'क्रश'वर लक्ष ठेवता... मग, ती व्यक्ती कधी उठते, कधी कुठे जाते, काय खाते ते कधी झोपते... इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठून का होईना पण ट्रॅक करता... 

8/12

तुम्ही कुणाच्या तरी प्रेमात पडलाय हे सर्वात अगोदर कुणाला समजत असेल तर ते असतात तुमच्या अगदी जवळचे मित्र-मैत्रिण... आणि अर्थातच मग ते तुम्हाला तुमच्या क्रशच्या नावानं चिडवणं सुरू करतात... आणि तुम्हीही हे चिडवणं एन्जॉय करता... 

9/12

आजकाल सोशल मीडियाचंही फॅड वाढलंय... त्यामुळे, तुमचं क्रश सोशल मीडियावर काय बोलतंय, कुणाशी बोलतंय, त्याचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत... या सर्व गोष्टींवर चोरी-छुप्या पद्धतीनं लक्ष ठेवलं जातं. 

10/12

तुम्ही तुमच्या क्रशला एखादा मॅसेज पाठवला असेल आणि पलीकडून त्याचा ताबडतोब रिप्लाय आला नाही तर तुम्ही थोडे खट्टू होता... आणि समजा तुम्हाला लगेच रिप्लाय आला तर तोच मॅसेज तुम्ही पुन्हा पुन्हा वाचता... 

11/12

आजकालच्या काळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्या हातातला मोबाईल... एखादी व्यक्ती सतत विनाकारण स्वत:चा मोबाईल हातात घेऊन एखादा मॅसेज किंवा फोन तर आला नाही ना? याची खात्री करत असेल तर समजून जा की ती व्यक्ती प्रेमात पडलीय.   

12/12

प्रेम... एक सुखद आणि आल्हाददायक भावना... कोणत्याही परिस्थितीत तुमचे पाय डळमळणार नाहीत याची खात्री आणि त्यासाठी प्रोत्साहन देतं ते प्रेम... पण, हीच भावना मनात निर्माण झाली की काही मूर्ख गोष्टी करण्यास आपण सुरुवात करतो... आपल्या कळत नकळत... आणि या गोष्टींमध्येही एक वेगळीच मजा असते... तुम्हीही कधी प्रेमात पडला असाल तर या गोष्टी नक्कीच केल्या असतील... चला, तर पाहुयात अशा कोण-कोणत्या गोष्टी आहेत ज्या हेरून तुम्ही ओळखू शकता की तुम्ही किंवा तुमचे मित्र-मैत्रिण प्रेमात पडलेत किंवा नाही... 