Dussehra, Diwali 2023 Date: दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त

Dussehra, Diwali 2023 Date : नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. तर लोकांना वेध लागले आहेत ते दसरा दिवाळी कधी याबद्दल...चला मग जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त 

नेहा चौधरी | Updated: Oct 15, 2023, 05:08 PM IST
Dussehra, Diwali 2023 Date: दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त  title=
dussehra dhantrayodashi diwali 2023 narak chaturdashi and govardhan puja Diwali Padwa Diwali Padwa bhaubi bhai dooj 2023 date and time shubh muhurt

Dussehra, Diwali 2023 Date : शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून आता खऱ्या अर्थाने सणांना सुरुवात झाली आहे. नवरात्रीचा उत्साहाची सांगता दसराने होते. तर त्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे...यंदा धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज अतिशय खास आहे. सणाचा प्रत्येक दिवसाला शुभ योग जुळून आला आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशांचा सण. सकारात्मक ऊर्जाचा हा सण अख्खा देश उत्साहाने न्हाऊन निघतो. (dussehra dhantrayodashi diwali 2023 narak chaturdashi and govardhan puja Diwali Padwa Diwali Padwa bhaubi bhai dooj 2023 date and time shubh muhurt)

दसरा 2023 कधी आहे?

आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा साजरा करण्यात येतो. पंचांगानुसार, या वर्षी ही तिथी 23 ऑक्टोबरला सायंकाळी 5.44 वाजता सुरू होणार असून 24 ऑक्टोबरला दुपारी 3.24 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 24 ऑक्टोबर 2023 ला दसरा साजरा करण्यात येणार आहे. 

शस्त्र पूजेसाठी शुभ मुहूर्त  - दुपारी 1:58 पासून दुपारी 2:43 वाजेपर्यंत 

रावण दहन मुहूर्त - संध्याकाळी 05.43 नंतर अडीच तासांसाठी

दसऱ्याचं महत्व

दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन केलं जातं असतं. रावणासह त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि मुलगा मेघनाथ यांचंही दहन करण्याची परंपरा आहे. हा सण वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतीक मानलं जातं. दसऱ्याच्या सणातून असं सांगितलं जातं की, वाईट कृत्य करणाऱ्याला निश्चितच शिक्षा होते. त्याशिवाय जीवनात सत्य आणि धर्माचा नेहमी विजय होतो. त्यामुळे सत्य, चांगुलपणा आणि धर्माचाच मार्ग अवलंबला पाहिजे. 

दसरा का साजरा करावा?

भगवान राम- सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत 14 वर्षे वनवासात असतात. त्यावेळी लंकेचा राजा रावण माता सीतेचं अपहरण करतो. माता सीतेला परत आणण्यासाठी सुग्रीव आणि वानरांसह श्रीभगवान राम सैन्य तयार करतो. या सैन्यासोबत प्रभु राम कुंभकर्ण आणि मेघनाथानंतर रावणाचा वध करतो. असं म्हणतात की राम आणि रावणाचे युद्ध 9 दिवस सुरु होतं. तर 10 व्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध केला होता. म्हणून दसरा हा सण नवरात्रीच्या 10 व्या दिवशी विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. 

धनत्रयोदशी कधी येईल?

यंदा 10 नोव्हेंबर 2023 ला धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी धनत्रयोदशी साजरी केली जाते. हा दिवश अतिशय शुभ मानला जातो. प्रदोष काळात या दिवशी कुबेर आणि लक्ष्मीची पूजा केल्यास धनाची कमतरता भासत नाही, अशी मान्यता आहे. हा दिवस आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी यांना समर्पित केला गेला आहे. धनत्रयोदशीला खरेदी केल्याने तेरापट फायदा होतो असं म्हणतात. 

धनत्रयोदशी पूजा मुहूर्त - संध्याकाळी 05.47 - संध्याकाळी 07.43 वाजेपर्यंत 
धनत्रयोदशीला खरेदी करण्याची वेळ - दुपारी 12.35 ते 11 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 01.57 वाजेपर्यंत 

नरक चतुर्दशी कधी आहे?

धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरा करण्यात येते. यादिवशी पहाटे उटण लावून सूर्य उगवण्यापूर्वी स्नान केलं जातं. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असंही म्हणतात. या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. यंदा नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबर 2023 ला असणार आहे. 

दिवाळी कधी आहे?

12 नोव्हेंबर 2023 ला लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. कार्तिक अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी घराच्या अंगणात दिवा लावून देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यात येतं. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख, समृद्धी, संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे. 

लक्ष्मी पूजन (प्रदोष काळ) – संध्याकाळी 05.39 ते 08.16
लक्ष्मी पूजा (निशिता काल वेळ) - 12  नोव्हेंबर 2023 - रात्री 11:39 ते 13 नोव्हेंबर 2023 दुपारी 12:32 वाजेपर्यंत

हेसुद्धा वाचा - Horoscope Money Weekly : 16 to 22 ऑक्टोबर 2023 : नवरात्रीत सूर्य गोचरमुळे 5 राशींचे अच्छे दिन; संपत्ती आणि प्रसिद्धीसोबत प्रगती

गोवर्धन पूजा, बलिप्रतिपदा आणि पाडवा कधी आहे? 

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला गोवधन पूजा करण्यात येते. यंदा गोवर्धन पूजा 14 नोव्हेंबर 2023 ला आहे. हा दिवस भगवान श्रीकृष्णाने इंद्राच्या पराभवाच्या स्मरणार्थ साजरा केला करण्यात येतो. गोवर्धन पूजेला अन्नकूट पूजा असंही म्हटलं जातं. याच दिवशी बलिप्रतिपदा आणि पाडवा सण साजरा करण्यात येणार आहे. पाडव्याला बायको आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्यांचं औक्षवान करते. 

गोवर्धन पूजा सकाळचा मुहूर्त - सकाळी 06:43  - सकाळी 08:52 वाजेपर्यंत

भाऊबीज कधी आहे?

भाऊ बहिणीचा पवित्र नात्याचा सण भाऊबीज 14 नोव्हेंबरला 2023 ला साजरा करण्यात येणार आहे. कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीच्या शुभ मुहूर्तावर बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळक करुन त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. उदय तिथीनुसार 14 नोव्हेंबरला 2023 ला भाऊबीज असणार आहे. 

भाऊबीज शुभ मुहूर्त - 14 नोव्हेंबरला दुपारी 01.33 -  03.22 वाजेपर्यंत

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)