Indira Ekadashi 2023: आज पितृपक्षातील इंदिरा एकादशी दुर्मिळ योग! शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Indira Ekadashi 2023 : पितृपक्षातील एकादशीला अतिशय महत्त्वा आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही एकादशी शुभ मानली जाते. त्याशिवाय सुख समृद्धीसाठी ही एकादशी खास आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 10, 2023, 04:45 AM IST
Indira Ekadashi 2023: आज पितृपक्षातील इंदिरा एकादशी दुर्मिळ योग! शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या  title=
Indira ekadashi 2023 puja muhurat and puja vidhi and indira ekadashi upay for pitru happiness and prosperity

Indira Ekadashi 2023 : हिंदी धर्मानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. कृष्ण पक्षातील एक आणि शुक्ल पक्षातील एक एकादशी असते. याचा अर्थ वर्षात 24 एकादशी असतात. भाद्रपद कृष्ण पक्षातील एकादशी अतिशय शुभ मानली जाते. या एकादशीला इंदिरा एकादशी असं म्हणतात. पितृपक्षात येणारी ही एकादशीचा उपवास केल्यास मोक्षाचे दरवाजे उघडतात असं मानलं जातं. त्याशिवाय पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही एकादशी शुभ मानली जाते. अशा इंदिरा एकादशीची तिथी, शुभ मुहूर्त, उपासना आणि महत्त्व जाणून घ्या. 

इंदिरा एकादशी एकादशी तिथीची शुभ मुहूर्त 

एकादशी तिथी सुरुवात - 9 ऑक्टोबर 2023 दुपारी 12:36 वाजता 
एकादशी तिथी समाप्त होईल - 10 ऑक्टोबर 2023, दुपारी 03:08 वाजता 
उदय तिथीनुसार, इंदिरा एकादशीचं व्रत मंगळवार 10 ऑक्टोबरला पाळलं जाणार आहे. 
उपवास सोडण्याची शुभ वेळ : 11 ऑक्टोबर, सकाळी 06:19 ते 08:38 वाजेपर्यंत आहे. 

इंदिरा एकादशीचे महत्त्व 

एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित केलं आहे. त्यामुळे विष्णूला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केलं जाते. इंदिरा एकादशीचं व्रत केल्यामुळे पुण्य प्राप्त होतं असं मान्यता आहे. त्याशिवाय पितृपक्षातील इंदिरा एकादशीला पूर्वजांना प्रसन्न करुन त्यांच्या आशिर्वाद मिळवता येतो. या व्रतामुळे पितृदोषातून मुक्ती मिळते. 

इंदिरा एकादशीचं व्रत कसं पाळावं 

इंदिरा एकादशीचं व्रत पितृपक्षात आल्यामुळे भक्तांनी श्राद्धाचे काही नियम पाळावेत, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.  एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करा आणि संकल्प करा. त्यानंतर श्राद्ध करुन भगवान विष्णूची पूजा करा. त्यांना फळं, दूध, सुका मेवा, तुळस इत्यादी सात्विक अन्न अर्पण करा. त्यानंतर देवाचा थोडा प्रसाद गायीला अर्पण करा. त्याशिवाय ब्राह्मणांना अन्नदान करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा.

इंदिरा एकादशीला काय करावे 

एकादशी व्रताच्या दिवशी देवासमोर दिवा लावा आणि आपल्या पितरांच्या उद्धारासाठी गीता वाचा किंवा श्रवण नक्की करा.  संपूर्ण गीता वाचणे शक्य नसेल तर किमान सातवा अध्याय वाचवा किंवा ऐकावा.  त्यानंतर आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना करावी.  संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा नक्की लावा आणि तुमच्या पितरांच्या उद्धारासाठी प्रार्थना करावी.  

इंदिरा एकादशी उपाय 

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळावर दुधाचं पाणी घालून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर पाच प्रकारची मिठाई अर्पण करा आणि झाडाखाली विष्णु सहस्त्रनाम पाठ करा. यानंतर 11 वेळा प्रदक्षिणा घाला. 

पितरांच्या आत्म्याला शांती पितरांच्या नावाने तर्पण आणि ब्राह्मण अन्नदान करा.  सायंकाळी दक्षिण दिशेला दिवा नक्की लावा. 

संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळ संध्याकाळ तुळशीच्या माळाने 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप करावा. 

पितृ पक्ष एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करावी. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून तुळशीला तुपाचे 11 दिवे नक्की लावा. 

या दिवशी भगवान शालिग्रामची पूजा केल्यानंतर गाय, कावळा, कुत्रा, मांजर आणि कोणत्याही गरीब आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करा. मुंग्यालाही पीठ खाऊ घाला. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)