राशीभविष्य : आज 'या' राशीच्या लोकांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस

पाहा कोण आहेत त्या व्यक्ती     

Updated: Mar 4, 2020, 08:42 AM IST
राशीभविष्य : आज 'या' राशीच्या लोकांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस  title=

मेष- तुम्ही जर कोणत्या निर्णयाची वाट पाहत असाल तर जरा संयम ठेवा. ऑफिसमधील कामांव्यतिरिक्त काधी अधिक करू इच्छूक असाल तर यश मिळेल. मेहनतीचं फळ नक्कीच चांगलं असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

वृषभ- आज तुमच्यासाठी निर्णय घेणं अतिशय सोपं असणार आहे. विचार स्पष्ट ठेवा. एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर आज योग्य वेळ आहे. कोणाला गरज भासल्यास त्यांची मदत करा.

मिथुन- रोजची कामे लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घ्याल. तुमच्या जबाबदाऱ्यांवर विशेष लक्ष द्या. वेळेचा योग्य वापर करा. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. 

कर्क- सर्वबळाने एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करा. यश तुमचंच आहे. एक्स्ट्रा काम मिळण्याची शक्यता आहे. चागल्यां बातमी प्रतिक्षा कराल. आरोग्य चांगले राहिल. 

सिंह- आज कोणत्याही कामावर दुर्लक्ष करू नका. पूर्ण एकाग्रताने काम कर. धन लाभ होण्याची शक्यता आहे. नव्या व्यक्तींना भेटण्याची शक्यता आहे. कुटुंबासह चांगला वेळ व्यतीत कराल 

कन्या- दिवस चांगला आहे. स्वत:च्या भावनांना आवर घाला. जवळच्या लोकांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवस योग्य आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 

तुळ- आज कोणतंही संकट ओढवू नका. पारंपरिकतेवर भर द्या. नव्या गोष्टींसाठी प्रयत्न करा. दिवस चांगला आहे. अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीकडून समर्थन मिळेल. मन दुसऱ्या कामांमध्ये गुंतवा. लक्ष्य केंद्रीत ठेवा. 

वृश्चिक- आजूबाजूच्या वातावरणामुळे तुम्हाला दिलासा मिळणार आहे. माहिती मिळवण्यासाठी नवे मार्ग अंमलात आणा. खरेपणाने इतरांना सामोरे जा. प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवस चांगला आहे. 

धनू- रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वेळेत अपूऱ्या इच्छा पूर्ण होतील. कामाचे फळ चांगले मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.  

मकर- बेरोजगार लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी इतरांची मदत मिळेल. मोठा निर्णय घेण्याआधी विचार करा. अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घ्या. प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस आहे. 

कुंभ- कुंभ- करिअरच्या दृष्टीने एखादी चांगली संधी मिळेल. शत्रूंवर तुमचं वर्चस्व असेल. काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकाल. आरोग्याची काळजी घ्या. आज नव्या लोकांना भेटण्याचा योग आहे. 

मीन- करिअरच्या दृष्टीने काही संवेदनशील निर्णय घ्याल. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज गरजेपेक्षा जास्त थकवा येईल. आरोग्याची काळजी घ्या.