Astrology: गुरुवारी शंखाशी निगडीत करा हे उपाय, आयुष्यभर राहील लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद

Thursday Remedies: हिंदू धर्मात पौराणिक, ज्योतिष, वास्तू, हस्तरेखा अशी अनेक शास्त्र आहेत. या शास्त्रांमध्ये प्रत्येक वस्तूंचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. शास्त्रानुसार पूजेत शंखाचं विशेष असं महत्त्व आहे. देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या शंखाची विधीपूर्वक पूजा केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात.

Updated: Jan 24, 2023, 05:54 PM IST
Astrology: गुरुवारी शंखाशी निगडीत करा हे उपाय, आयुष्यभर राहील लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद title=

Thursday Remedies: हिंदू धर्मात पौराणिक, ज्योतिष, वास्तू, हस्तरेखा अशी अनेक शास्त्र आहेत. या शास्त्रांमध्ये प्रत्येक वस्तूंचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. शास्त्रानुसार पूजेत शंखाचं विशेष असं महत्त्व आहे. देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या शंखाची विधीपूर्वक पूजा केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. शास्त्रानुसार, शंखाची उत्पत्ती समुद्र मंथनावेळी झाली होती. शंखाला देवी लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं. त्यामुळे देव्हाऱ्यात शंखाची स्थापना पवित्र मानली जाते. या शंखाला गुरुवारी केसर तिलक लावल्याने भगवान विष्णुंसह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. भगवान विष्णुंचा आशीर्वाद मिळाल्याने कामं झटपट मार्गी लागतात. चला जाणून घेऊयात गुरुवारी शंखाची विधीपूर्वक पूजा कशी केली पाहीजे आणि शंखाचा उपयोग कसा केला पाहीजे. 

  • गुरु ग्रहासाठी- भगवान विष्णुंना प्रसन्न करण्यासाठी शंखाला केसर तिलक लावावा. त्याचबरोबर विष्णुंची मनोभावे पूजा करावी. यामुळे कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होतो. तसेच व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होते. 
  • शुक्र ग्रहासाठी- शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी शंख सफेद वस्त्रात ठेवला पाहीजे. यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. 
  • बुध ग्रहासाठी- बुधवारी शंखामध्ये तूळस आणि पाणी टाकून शालीग्रामचा अभिषेक करावा. यामुळे बुध ग्रह मजबूत होतो.
  • चंद्र ग्रहासाठी- कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी शंखामध्ये दूध भरून शिवजींचा अभिषेक करावा. यामुळे कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो.
  • मंगळ ग्रहासाठी- मंगळवारी शंख वाजवून सुंदरकांडचं पठण करावं. यामुळे मंगळाची स्थिती मजबूत होते.
  • सूर्य ग्रहासाठी- रविवारी शंखामध्ये पाणी भरून सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यास व्यक्तीला नवी उर्जा मिळते. 

बातमी वाचा- Rajyog 2023: 20 वर्षानंतर 4 राजयोग! तीन राशींना मिळणार आर्थिक पाठबळ

शंखाचे विविध प्रकार- लक्ष्मी शंख, गोमुखी शंख, कामधेनु शंख, विष्णु शंख, देव शंख, चक्र शंख, पौंड्र शंख, सुघोष शंख, गरूड़ शंख, मणिपुष्पक शंख, राक्षस शंख, शनि शंख, राहु शंख, केतु शंख, शेषनाग शंख, कच्छप शंख, गोमुखी शंख, पांचजन्य शंख, अन्नपूर्णा शंख, मोती शंख, हीरा शंख असे अनेक प्रकार आहेत.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)