4 Rajyog In 2023: राशीचक्रानुसार ग्रहमंडळात होणारे बदल जातकांच्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. तेव्हा काही शुभ-अशुभ युती होतात. यामुळे काही योगही तयार होतात. वर्ष 2023 रोजी 4 राजयोग तयार होत आहेत. विशेष म्हणजे 20 वर्षानंतर अशी स्थिती जुळून आली आहे. सत्कीर्ती, हर्ष, भारती आणि वरिष्ठ राजयोग एकत्र आले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ योगांचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडतो. मात्र काही राशी अशा आहेत की, त्यांना या स्थितीचा फायदा होईल. चला जाणून घेऊयात या राशींबाबत
तूळ रास- 20 वर्षांनंतर जुळून आलेला 4 राजयोग तूळ राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. 17 जानेवारीला तूळ राशीच्या जातकांची अडीचकीतून मुक्तता झाली आहे. जवळपास अडीच वर्षे या राशीच्या लोकांना न्यायदेवता शनिदेवतेच्या कठोर परीक्षेतून जावं लागलं होतं. त्यामुळे आता सुगीचे दिवस आले आहेत असं म्हणावं लागेल. त्यामुळे जातकांना चार राजयोग फायदेशीर ठरतील. या राजयोगामुळे जातकांना व्यवसाय नोकरीत यश मिळेल. तसेच अचानक धनलाभ होण्याचा योगही आहे. त्याचबरोबर कुटुंबाचीही साथ मिळेल.
धनु रास- ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीच्या जातकांनी 4 राजयोगाचा फायदा मिळणार आहे. धनु राशीच्या जातकांची नुकतीच साडेसातीतून सुटका झाली आहे. शनिदेवांनी कठोर परीक्षा घेतल्यानंतर आता चांगले दिवस येतील असा योग आहे. ज्या कामात हात घालात त्यात यश मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असून चांगला परतावा मिळेल. भौतिक सुख सुविधा या काळात मिळतील. राजकारणात असलेल्या लोकांना या काळात पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. मात्र वैयक्तिक कुंडलीतील ग्रहही तितकेच अनुकूल असणं गरजेचं आहे.
वृषभ रास- 4 राजयोगांमुळे वृषभ राशीला चांगले दिवस येतील. इतकंच काय तर समाजात मान सन्मान देखील वाढेल. प्रत्येक कामात आपसूक यश मिळताना दिसेल. म्हणजेच या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. अविवाहित जातकांचं या काळात लग्न जमू शकतं. आर्थिकदृष्ट्या ही वेळ लाभदायी ठरेल. या दरम्यान धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)