2023 World Cup: वर्ल्डकपच्या तारखा ठरल्या? 'या' दिवशी रंगणार अंतिम सामना

 2023 चा वनडे वर्ल्डकप भारतात खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळवले जाणार आहेत. 

Updated: Mar 22, 2023, 04:49 PM IST
2023 World Cup: वर्ल्डकपच्या तारखा ठरल्या? 'या' दिवशी रंगणार अंतिम सामना title=

2023 World Cup: यंदाच्या वर्षी भारतात ICC 2023 वनडे वर्ल्ड कप (World Cup 2023) खेळवला जाणार आहे. दरम्यान याचबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. वनडे वर्ल्डकपच्या तारखांची माहिती समोर आली आहे. याशिवाय या वर्ल्डकपची फायनल (World Cup Final) कधी खेळवली जाणार आहे, याची तारीख देखील समोर आली आहे. ईएसपीएन क्रिकइंफोच्या एका रिपोर्टप्रमाणे, भारतात होणारा वर्ल्डकप (World Cup) 5 ऑक्टोबर रोजी सुरु होईल.

2023 च्या तारखांबाबत माहिती समोर

रिपोर्टमध्ये असा खुलासा झालाय की, 2023 च्या वनडे वर्ल्डकपचा फायनल (World Cup Final) सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) रंगणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 2023 चा वनडे वर्ल्डकप भारतात खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळवले जाणार असून यामध्ये हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, इंदूर, दिल्ली, लखनऊ, चेन्नई, बंगळूरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. 

कधी रंगणार फायनल?

सध्या टीम इंडियाने संपूर्ण लक्ष्य आता वनडे वर्ल्डकपकडे वळवलं आहे. 2011 साली टीम इंडियाने भारतात वर्ल्डकप जिंकला होता. याला आता 12 वर्ष उलटून गेली आहेत. मात्र यंदाचा वर्ल्डकप भारतातच असल्याने भारत याचा प्रबळ दावेदार मानला जातोय.

कोण जिंकणार वर्ल्डकप?

यंदाचा वर्ल्डकप कोण जिंकणार याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने (Brett Lee) याने भविष्यवाणी केली आहे. स्पोर्ट्स यारीशी बोलताना ब्रेट ली म्हणाला, 'भारत 2023 वर्ल्डकप जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जातोय. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला हरवणं फार कठीण होणार आहे. कारण हा वर्ल्डकप भारतात रंगणार आहे. त्यामुळे मायदेशात भारत अधिक आक्रमक पद्धतीने क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे. यामुळे वनडे वर्ल्डकपवर भारत नाव कोरले जाण्याची जास्त शक्यता आहे."