धोनीला आयपीएल जिंकवून देणाऱ्या खेळाडूची राजकारणात एन्ट्री, 'या' पक्षासोबत नवी इनिंग

CSK Cricketer in Politics : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या उपस्थितीत अंबाती रायडू याने वायएसआर काँग्रेसमध्ये (YSR Congress) प्रवेश केला आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Dec 28, 2023, 08:33 PM IST
धोनीला आयपीएल जिंकवून देणाऱ्या खेळाडूची राजकारणात एन्ट्री, 'या' पक्षासोबत नवी इनिंग title=
ambati rayudu, YSR Congress, Politics

Ambati Rayudu joins YSR Congress : टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जला (CSK) आयपीएल जिंकून देणाऱ्या अंबाती रायडू (Ambati Rayudu) ची नवी इनिंगला सुरूवात केली आहे. क्रिकेटच्या मैदानाला रामराम ठोकल्यानंतर अंबाती रायडू राजकारणात (Ambati Rayudu in Politics) प्रवेश करेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. अशातच आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या उपस्थितीत अंबाती रायडू याने वायएसआर काँग्रेसमध्ये (YSR Congress) प्रवेश केला आहे. त्यामुळे आता अंबाती नव्या इनिंगसाठी सज्ज झाल्याचं पहायला मिळतंय.

वायएसआरने दिली माहिती

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर अंबाती तिरुपती रायडू मुख्यमंत्री वायएस जगन यांच्या उपस्थितीत सीएम कॅम्प ऑफिसमध्ये वायएसआर काँग्रेस पक्षात सामील झाला. उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर अंबाती रायडूने आंध्र प्रदेशच्या राजकारणातील दुसऱ्या डावाची घोषणा केली होती.

अंबाती रायडू याने काही दिवसांपूर्वी त्याच्या मूळ जिल्ह्यातील गुंटूरचा दौरा केला होता. त्यावेळी त्याने स्थानिक पत्रकारांशी चर्चा केली. त्यावेळी त्याने आपण लवकरच राजकारणात (Ambati Rayudu In Politics) येणार असल्याचं जाहीर केलं. "मी लवकरच आंध्र प्रदेशातील लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात प्रवेश करणार आहे. त्याआधी मी जिल्ह्याच्या विविध भागात जाऊन लोकांची नाडी जाणून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचं ठरवलंय", असंही अंबाती रायडू (Ambati Rayudu) म्हणाला होता. त्यानंतर आता त्याने अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केलाय.

दरम्यान, अंबाती रायडूने 2013 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. आपल्या 55 सामन्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीत त्याने 47 च्या सरासरीने 1694 धावा केल्या. यामध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतकेही आहेत. 2018 मध्ये, तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला. या काळात रायुडूने 203 सामन्यात 4328 धावा केल्या. त्याने मुंबई इंडियन्ससह तीन आणि चेन्नई सुपर किंग्जसह तीन आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत.