कॅप्टन कोहलीचा हा रोमॅन्टीक अंदाज तुम्ही पाहिलात का?

न्यूझीलंड विरुद्ध सीरिजपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत रोमॅन्टीक मुडमध्ये पहायला मिळाला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 21, 2017, 05:00 PM IST
कॅप्टन कोहलीचा हा रोमॅन्टीक अंदाज तुम्ही पाहिलात का?  title=
Image: Screen Grab

नवी दिल्ली : न्यूझीलंड विरुद्ध सीरिजपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत रोमॅन्टीक मुडमध्ये पहायला मिळाला.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

एका व्हिडिओ अॅडमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एकत्र दिसले. अनुष्का-विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून शेअरही केला जात आहे.

या व्हिडिओत दोघेही एकमेकांना लग्नाचं वचन देत असल्याचं दिसत आहे. पहिलं वचन विराट देतो आणि म्हणतो, "मी वचन देतो की महिन्यातील १५ दिवस जेवन मी बनवेल." यानंतर अनुष्का शर्मा म्हणते की, "मी वचन देते की, तुझे सर्व सिक्रेट पासवर्ड्स प्रोटेक्ट करुन आपल्या मनात ठेवेल." मग विराट कोहली म्हणतो, "मी तुला बदलण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही."

त्यानंतर वचन देताना अनुष्का शर्मा म्हणते, "मी तुला कधी-कधी कॅरममध्ये जिंकू देईल." त्यानंतर कोहली वचन देत म्हणतो "कुठल्याही शोचा फायनल एपिसोड तुझ्याशिवाय पाहणार नाही." शेवटी विराट कोहली अनुष्काला म्हणतो की, "मी नेहमीच तुझी काळजी घेईल." विराटचं हे वाक्य ऐकूण अनुष्काही म्हणते "मी सुद्धा."

दरम्यान, सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेले विराट-अनुष्का यांची जोडी यापूर्वीही एका जाहिरातीमध्ये एकत्र दिसली होती. यापूर्वी ही जोडी एका शॅम्प्यूच्या जाहिरातीत दिसली होती.