Arjun tendulkar : रोहित शर्माला मारली मिठी आणि...; डेब्यू कॅप मिळताच अर्जुन झाला भावूक, पाहा व्हिडीओ

रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आलीये. मात्र सामन्यापूर्वी रोहितने अर्जुन तेंडुलकरला डेब्यू कॅप दिली. यावेळी अर्जुनने रोहितला मिठी मारली. रोहितला मिठी मारताना अर्जून भावूक झाल्याचं दिसून आलं. 

Updated: Apr 16, 2023, 04:59 PM IST
Arjun tendulkar : रोहित शर्माला मारली मिठी आणि...; डेब्यू कॅप मिळताच अर्जुन झाला भावूक, पाहा व्हिडीओ title=

Arjun tendulkar : अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun tendulkar) चाहत्यांची प्रतिक्षा अखेर आज संपलीये. सचिनचा (Sachin tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) डेब्यू केलाय. गेल्या 3 वर्षांपासून अर्जुन मुंबई इंडियन्सच्या टीमचा भाग होता, मात्र त्याचा प्लेईंग 11 (Playing 11) मध्ये समावेश केला जात नव्हता. अखेर आज तो दिवस आला आणि अर्जुनला मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्माने अर्जुनला डेब्यू कॅप दिली. यावेळी अर्जुन भावूक (Arjun tendulkar Gets Emotional) झाल्याचं दिसून आलं. 

रोहितने दिली अर्जुनला डेब्यू कॅप

आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा प्लेईंग 11 मध्ये नाहीये. त्यामुळे रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आलीये. मात्र सामन्यापूर्वी रोहितने अर्जुन तेंडुलकरला डेब्यू कॅप दिली. यावेळी अर्जुनने रोहितला मिठी मारली. रोहितला मिठी मारताना अर्जून भावूक झाल्याचं दिसून आलं. 

भावाला सपोर्ट करण्साठी बहीण मैदानात

आज अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून डेब्यू केलाय. दरम्यान भावाला पहिल्याच सामन्यात सपोर्ट करण्यासाठी बहिण सारा तेंडुलकर मैदानात आली आहे. प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या सारा भावाला पाठिंबा देताना दिसत आहेत. अर्जुनने त्याचा करियरमध्ये आतापर्यंत 12 टी-20 विकेट घेतल्या आहेत.

वडिलांकडून घेतला खास सल्ला

सामना सुरु होण्यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये सचिन आपल्या मुलाला खास सल्ला देताना दिसतोय. सामना सुरु होताच पहिली ओव्हर अर्जुनने टाकली. यावेळी त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन्स दिले. तर 2 ओव्हर्समध्ये 8.50 च्या इकोनॉमीने 17 रन्स खर्च केलेत.

3 वर्षांपासून डेब्यूची प्रतिक्षा अखेर संपली

अर्जुन तेंडुलकरला 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ऑक्शनमध्ये विकत घेतलं होतं. मात्र यावेळी त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. अखेर आज त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध डेब्यू केला आहे.