ASHES 2017 : Perth Test, शेवटच्या दिवशी हवामानामुळे पिच खराब

वाका मैदानावर होणाऱ्या अॅशेज सिरीजच्या तिसऱ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी पावसाने गोंधळ घातला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 18, 2017, 12:20 PM IST
ASHES 2017 : Perth Test, शेवटच्या दिवशी हवामानामुळे पिच खराब title=

पार्थ : वाका मैदानावर होणाऱ्या अॅशेज सिरीजच्या तिसऱ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी पावसाने गोंधळ घातला. 

सकाळी पाऊस नव्हता मात्र पिचवरून कव्हर काढल्यानंतर ओले डाग आढळून आले. महत्वाचं म्हणजे १७ डिसेंबर रोजी संध्याकाळपासून पार्थमध्ये भरपूर पाऊस झाला. यामुळे पिचची वाट लागली. हे पाण्याचे डाग काढण्यासाठी मैदानात कर्मचारी तैनात होते. मात्र त्याचा फार काही उपयोग झाला नाही. यामुळे लंच लवकरच घोषित करावा लागला आणि पहिला सत्रातील पूर्णपणे वेळ पावसातच गेला. 

यामुळे सगळीकडेच नाराजी व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलिया संघाला विजय जवळ वाटत होता त्यांचा हिरमोड झाला आहे. यांच्याबरोबच प्रेक्षक देखील नाराज आहे जे हा खेळ पाहू शकले नाहीत. सगळ्यात जास्त नाराज झाले आहेत इंग्लंडचे कॅप्टन कारण त्यांच्या संघाला वाचवणं आता त्यांच्या हातात राहिलेलं नाही. इंग्लंड पिचच्या या अडचणीमुळे अगोदरच एक सेट फलंदाजाचा गमावून बसलेला आहे 

असं सांगण्यात येत आहे की, चौथ्या दिवशी जेम्स विंसे ५५ च्या निजी स्कोरवर फलंदाजी करत होता. त्यावेळी मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता. भेगा पडलेल्या पिचवर चेंडू टाकताच त्याने आपली जागा बदलली आणि विंसेची ऑफ स्टंप उडवून घेऊन गेली. या बॉलला इंग्ल्ंडच्या माजी कॅप्टन केविन पीटरसनने बॉल ऑफ द एशेजची उपाधी दिली होती. आऊट होताच विंसे पिचवर अगदी हतबल दिसला. 

पाऊस नव्हता तेव्हा अशीच शक्यता वर्तवली जात होती की लंच नंतर सामना सुरू होईल. अंपायर देखील सामना सुरू करण्याचा निर्णय सहजपणे घेऊ शकत नाहीत. कारण पिचवर पावसाचं पाणी पसरल्यामुळे अडचणी होत आहे.