Asia Cup 2022 : अन् स्टेडियममध्ये रंगला 'गणपती बाप्पा'चा जयघोष, VIDEO होतोय व्हायरल

 'गणपती बाप्पा'च्या जयघोषाने पाकिस्तान फॅन्सची बोलती बंद, VIDEO पाहिलात का? 

Updated: Sep 1, 2022, 01:53 PM IST
Asia Cup 2022 : अन् स्टेडियममध्ये रंगला 'गणपती बाप्पा'चा जयघोष, VIDEO होतोय व्हायरल  title=

दुबई : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) बुधवारी टीम इंडियाने (Team India) हाँगकाँगचा पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सुपर 4 मध्ये टीम इंडियाचा नेमक्या कोणत्या संघाशी सामना रंगणार याची उत्सुकता आता क्रिकेट फॅन्सला लागली आहे. या दरम्यानच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नेमकं या व्हिडिओत काय आहे, ते जाणून घेऊयात. 

व्हिडिओत काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत रंगतदार सामना सुरु आहे. या सामन्यात क्रिकेट फॅन्स त्यांच्या त्यांच्या टीम्सना चिअर करताना दिसत आहे. या चिअर्स वरून इतकं नक्कीचं कळतयं की हा सामना टीम इंडिया विरूद्ध पाकिस्तानमध्ये रंगला आहे. या सामन्यात मॅच अंतिम टप्प्यात पोहोचला असताना क्रिकेट फॅन्स आपआपल्या टीमना चिअर करताना दिसतायतं. 

टीम इंडिया आणि पाकिस्तान (India vs Pakistan)  मधला सामना म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडतात. या दोन्ही टीमच्या प्रत्येक सामन्यात खेळाडूचं नाही तर फॅन्स देखील भिडताना अनेकदा पाहायला मिळालंय. असाच एक फॅन्स भिडल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या सामन्यात भारतीय फॅन्स 'हिंदूस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देतायत. या घोषणा पाहून पाकिस्तान फॅन्सही टीमला चीअर करायला सुरु करतात. फॅन्स ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे द्यायचा सुरु करतात.आणि इतरांनी त्याची साथ देण्याचा प्रयत्न सुरु केला. पण त्यानंतर जे घडलं ते भलतंच होतं.

पाकिस्तान फॅन्सची बोलती बंद
दोन्ही टीममध्ये झिंदाबादच्या घोषणा सुरु झाल्या. त्यामुळे फॅन्समध्येही टशन पाहायला मिळाली. या दरम्यानचं एक भारतीय फॅन 'गणपती बाप्पा मोरया'च्या घोषणा द्यायला सुरुवात करतो. या घोषणेला इतर भारतीय फॅन्सही साथ द्यायला सुरु करतात. आणि स्टेडीयमध्ये एकच गणपती बाप्पाच्या जयघोषाचा आवाज घुमतो. भारतीय फॅन्सच हे चिअर पाहून पाकिस्तान फॅन्सची बोलतीचं बंद होते. पाकिस्तान फॅन्सला काय चिअर करावे हेच कळत नाही आणि ते शांत बसतात. या संदर्भातला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Be Harami (BH) (@be_harami)

 
कसा रंगला होता सामना?
2018 साली रंगलेल्या आशिया कपमधला (Asia Cup 2022)  हा सामना होता. भारत-पाकिस्तान त्यावेळी आमने-सामने आले होते. रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा होती. या सामन्य़ात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार बॅटींग करत पाकिस्तानी संघाचा धुव्वा उडवला होता. टीम इंडियाने ९ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला होता. 

दरम्यान यंदाच्या आशिया कपमध्ये टीम इंडिया फॉर्ममध्ये आहे. आशिया कपवर नाव कोरण्यात टीम इँडिया प्रमुख दावेदार असल्याचीही चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे.