Asia Cup 2022: टीम इंडियासाठी गुड न्यूज, Rahul Dravid संदर्भातली मोठी अपडेट आली समोर

टीम इंडियाच्या जीवात जीव, राहूल द्रविड एशिया कप आधी फिट होणार? तुम्हाला काय वाटतं 

Updated: Aug 23, 2022, 09:54 PM IST
Asia Cup 2022: टीम इंडियासाठी गुड न्यूज, Rahul Dravid संदर्भातली मोठी अपडेट आली समोर  title=

युएई : आशिया कप 2022  (Asia Cup 2022) येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. याआधीच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यामुळे टीम इंडियासह क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. पण आता काळजी करण्याचे कारण नाही कारण राहूल द्रविड (Rahul Dravid)  संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.  

बीसीसीआय मंगळवारी सांगितले की, टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविडला (Rahul Dravid)  कोरोनाची लागण झाली आहे. द्रविडमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. द्रविड (Rahul Dravid)  बीसीसीआयच्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. द्रविडचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर भारतीय संघात सामील होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यावर म्हणाला आहे की, द्रविडबद्दल (Rahul Dravid) फारशी काळजी करू नये. 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी संघात सामील होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मला वाटत नाही की याने फारसा फरक पडेल. हा फक्त फ्लू आहे. तीन-चार दिवसांत तो बरा होईल आणि तो संघात सामील होईल.

दरम्यान ओव्हल येथे इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान शास्त्री यांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले, "गेल्या वर्षी जेव्हा मला कोविड झाला तेव्हा मी सहा दिवसांत ड्रेसिंग रूममध्ये होतो. आणि मी तुम्हाला वचन देतो की जर मी 6-7 दिवसांत ड्रेसिंग रूममध्ये येऊ शकलो, तर भारताचे प्रशिक्षकही येतील,असेही ते म्हणाले.  

दरम्यान आशिया कपमध्ये (Asia Cup 2022)  28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. या सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता आहे.