बॉल टेम्परींग: ऑस्ट्रेलिया क्रिकेट प्रशिक्षक पदाचाही राजीनामा देणार लेहमन

ऑस्ट्रलिया क्रिकेट संघाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमन हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. लेहमन राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले होते. पण, लेहमन यांनी स्वत:च ही घोषणा गुरूवारी केली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 29, 2018, 08:20 PM IST
बॉल टेम्परींग: ऑस्ट्रेलिया क्रिकेट प्रशिक्षक पदाचाही राजीनामा देणार लेहमन title=

नवी दिल्ली : बॉल टेम्परींगमुळे (चेंडू कुरतडणे) चर्चेत आलेल्या आणि क्रिकेट विश्वातून होणाऱ्या चौफेर टीकेला करण ठरलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी आणखी एक धक्का आहे. ऑस्ट्रलिया क्रिकेट संघाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमन हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. लेहमन राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले होते. पण, लेहमन यांनी स्वत:च ही घोषणा गुरूवारी केली.

दक्षिण अफ्रिकेत होणारी ४ सामन्यांची टेस्ट मालिका शेवटची

बॉल टेम्परींग प्रकरण आणि आपल्या राजीनाम्याच्या घोषणेबाबत बोलताना लेहमन म्हणाले, दक्षिण अफ्रिकेत होणाऱ्या ४ सामन्यांची टेस्ट मालिका ही आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीतील शेवटची मालिका असेल. ही मालिका संपताच आपण पदाचा राजीनामा देणार आहोत. बॉल टेम्परींग प्रकरणात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरन बॅनक्राफ्ट हे जाळ्यात आडकले. हे प्रकरण उजेडात आल्यापासून डेरेन लेहमनही चर्चेत होते. त्यांच्यावरही जगभरातील सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांतून टीका होत होती. त्यामुळे लेहमन राजीनामा देणार का, याबात  उत्सुकता होती.

लज्जास्पद वर्तन - ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया

दरम्यान, प्रशिक्षक पदावर असलेल्या लेहमन यांच्या मान्यतेखेरीज बॉल टेम्परींगचा कट रचला होता का? असा सवाल उपस्थित केला जात होता. सलामीचा फलंदाज बॅनक्राफ्टने मैदानावर हा प्रश्नही उपस्थित केला होता. त्यामुळे लेहमानवर प्रचंड दबाव होता. या प्रकरणावर प्रतिक्रीया देताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅकेल टर्नबूल यांनीही अत्यंत लज्जास्पद वर्तन असे म्हटले होते.

आयुष्यभरासाठी घडली अद्दल

बॉल टेम्परींगच्या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच वादात अडकला आहे. प्रश्न केवळ वादाचा नाही तर, ऑस्ट्रेलियन संघाच्या जागतिक विश्वासार्हतेचाही बनला आहे. या प्रकरणात कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि सालामीचा फलंदाज कॅमरन बेनक्रॉफ्ट यांच्यावर अनुक्रमे १,१ वर्ष आणि ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणामुळे स्मिथ आणि वॉर्नर यांना करणधारपद आणि उपकर्णधारपदही सोडावे लागले आगहे.