SRH vs GT : भुवनेश्वर कुमारच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

भुवनेश्वर कुमारच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, जो कोणत्याही बॉलरला कधीही आपल्या नावावर असावा असं वाटणार नाही... पाहा नेमकं काय केलंय भुवीनं 

Updated: Apr 12, 2022, 10:01 AM IST
SRH vs GT : भुवनेश्वर कुमारच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड title=

मुंबई : आयपीएलमधील हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना सोमवारी पार पडला. या सामन्यात गुजरातचा पराभव झाला. हैदराबादला सलग दुसरा विजय मिळवण्यात यश आलं. हैदराबादने हा सामना जिंकला पण स्टार बॉलर भुवनेश्वर कुमारने नकोसा रेकॉर्ड केला. त्याची चर्चा होत आहे. 

हा रेकॉर्ड कोणताही बॉलर आपला नावावर होऊ नये अशी प्रार्थना करत असतो. मात्र भुवीच्या नावावर या लाजीरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली. भुवीने असा कोणत्या रेकॉर्ड केला जाणून घेऊया. 

हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवीने 11 धावा वाइड बॉलनं घालवल्या. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर ही ठरली. 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध डावाच्या पहिल्याच षटकात 17 धावा दिल्या होत्या.

आता भुवनेश्वर कुमारनेही स्टेनची बरोबरी केली. डावाच्या सुरुवातीच्या षटकात सर्वाधिक धावा देणारे डेल स्टेन आणि भुवनेश्वर कुमार यांच्या नावावर नोंद करण्यात आली आहे. दोघांचे नाव संयुक्तपणे पहिल्या स्थानावर असले तरी भुवनेश्वर कुमारचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. 

भुवनेश्वर कुमारने 2016 मध्ये केकेआर विरुद्ध हैदराबादसाठी पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केला. दक्षिण आफ्रीकाच्या डेल स्टेनने बंगळुरू विरुद्ध 17 धावा दिल्या होत्या. तेही वाइड बॉल होते.