चॅम्पियन्स ट्रॉफी : डिव्हिलियर्सचा हा रेकॉर्ड तोडून विराट कोहली रचणार इतिहास

भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तो सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही बनवू शकतो.

Updated: Jun 15, 2017, 06:48 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी : डिव्हिलियर्सचा हा रेकॉर्ड तोडून विराट कोहली रचणार इतिहास  title=

लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तो सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही बनवू शकतो.
विराटने 182 एकदिवसीय सामन्यांमध्ये 53.82 च्या सरासरीने 7912 धावा केल्या आहेत. यामध्ये 27 शतके आणि 41 अर्धशतकांचा समावेश आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावा दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 190 सामन्यांमध्ये 182 इनिंग खेळल्या आहेत.
विराट कोहलीला आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत आठ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त 88 धावांची गरज आहे.