चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल : भारताला विजयासाठी हव्या २६५ रन्स

 चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमीफायनल जिंकण्यासाठी भारताला २६५ रन्सची आवश्यकता आहे. 

Updated: Jun 15, 2017, 06:29 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल : भारताला विजयासाठी हव्या २६५ रन्स title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमीफायनल जिंकण्यासाठी भारताला २६५ रन्सची आवश्यकता आहे. भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि सुरुवातीलाच बांग्लादेशला दोन धक्के दिले. त्यानंतर मात्र तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहीम यांनी बांग्लादेशचा डाव सावरला.

तमीम आणि मुशफिकूरमध्ये तिसऱ्या विकेटसाठी तमीमनं मुशफिकूर रहीमबरोबर १२३ रन्सची पार्टनरशीप केली आणि बांग्लादेशचा डाव सावरला.  तमीम इक्बालनं ८२ बॉल्समध्ये ७० रन्सची खेळी केली. तर मुशफिकूर रहीमनं ८५ बॉल्समध्ये ६१ रन्स केल्या. कॅप्टन मशरफी मोर्तजानं शेवटी फटकेबाजी करून बांग्लादेशला २६४/७ पर्यंत पोहोचवलं. भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि केदार जाधवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाला एक विकेट घेण्यात यश आलं.