आयपीएल फायनल : हैदराबादचं चेन्नईपुढे १७९ रनचं आव्हान

आयपीएलच्या फायनलमध्ये हैदराबादनं चेन्नईपुढे १७९ रनचं आव्हान ठेवलं आहे.

Updated: May 27, 2018, 08:58 PM IST
आयपीएल फायनल : हैदराबादचं चेन्नईपुढे १७९ रनचं आव्हान  title=

मुंबई : आयपीएलच्या फायनलमध्ये हैदराबादनं चेन्नईपुढे १७९ रनचं आव्हान ठेवलं आहे. हैदराबादनं २० ओव्हरमध्ये १७८/६ एवढा स्कोअर केला. या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार धोनीनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंग करणाऱ्या हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनिंगला आलेला श्रीवत्स गोस्वामी स्कोअरबोर्डवर १३ रन असताना रन आऊट झाला. त्यानंतर शिखर धवन आणि हैदराबादचा कर्णधार केन विलियमसननं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण धवन २६ रनवर आऊट झाला. केन विलियमसननं ३६ बॉलमध्ये सर्वाधिक ४७ रन केल्या. तर युसुफ पठाणनं २५ बॉलमध्ये नाबाद ४५ रन केल्या. कार्लोस ब्रॅथवेटनं ११ बॉलमध्ये २१ रनची जलद खेळी केली. ब्रॅथवेट २० व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आऊट झाला. चेन्नईकडून एनगीडी, शार्दुल ठाकूर, करण शर्मा, ड्वॅन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी १ विकेट मिळाली.

चेन्नईची मदार बॅटिंगवर 

चेन्नईचा अंबाती रायडू या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंही त्याच्या वादळी खेळीची चुणूक अनेक सामन्यांमध्ये दाखवली आहे. चेन्नईचा ओपनर शेन वॉटसननंही यावर्षी एक शतक झळकवलं आहे. तर हैदराबादविरुद्धच्याच प्ले ऑफ मॅचमध्ये फॅप डुप्लेसिसनं चेन्नईला एक हाती मॅच जिंकवून दिली. या मॅचमध्ये चेन्नईची बॅटिंग तर हैदराबादची बॉलिंग मजबूत आहे. हैदराबादकडे भुवनेश्वर कुमार, राशिद खान आणि सिद्धार्थ कौल हे बॉलर आहेत. राशिद खाननं कोलकात्याविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये अष्टपैलू कामगिरी करत हैदराबादला फायनलमध्ये पोहोचवलं होतं.

याआधी चेन्नईनं २०१० आणि २०११ अशी दोन वेळा आयपीएल जिंकली होती. तर हैदराबादला २००९ आणि २०१६ साली आयपीएल जिंकता आली. पण २००९ साली हैदराबादच्या टीमचं नाव आणि मालक वेगळे होते. त्यामुळे यावर्षी विजय होणारी टीम ३ वेळा आयपीएल जिंकण्याच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल. ३ आयपीएल जिंकण्याचं रेकॉर्ड सध्या मुंबईच्या नावावर आहे. मुंबईनं २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएल जिंकली होती.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा