तिसऱ्या टेस्टमध्ये चेतेश्वर पुजाराचं लाजिरवाणं रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

Updated: Jan 24, 2018, 04:56 PM IST
तिसऱ्या टेस्टमध्ये चेतेश्वर पुजाराचं लाजिरवाणं रेकॉर्ड  title=

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टप्रमाणेच या टेस्टमध्येही भारताला सुरुवातीला धक्के लागले. पहिले के.एल.राहुल शून्यवर आणि मग मुरली विजय ८ रन्सवर आऊट झाला.

पहिल्या दोन विकेट पडल्यावर बॅटिंगला आलेल्या पुजारा आणि विराट कोहलीनं भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यामध्ये चेतेश्वर पुजाराच्या नावावर एक लाजिरवाणं रेकॉर्ड झालं आहे. ५३ बॉल्स खेळल्यावर चेतेश्वर पुजाराला पहिली रन काढता आली.

सर्वात जास्त बॉल खेळल्यावर पहिली रन काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पुजारा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या जेफ अलॉटनं १९९९ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ७७व्या बॉलला पहिली रन काढली. तर इंग्लंडच्या जेम्स अंडरसननं २०१४ साली श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ५५ बॉल्स खेळल्यावर पहिली रन काढली.