पुन्हा 'गेल' वादळ, केला विश्वविक्रम

वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेलनं क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 12, 2017, 08:12 PM IST
पुन्हा 'गेल' वादळ, केला विश्वविक्रम  title=

ढाका : वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेलनं क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे. बांग्लादेश प्रिमिअर लीगच्या फायनल मॅचमध्ये रंगापूर रायडर्सकडून खेळताना गेलनं तब्बल १८ सिक्स मारल्या. टी-20 क्रिकेटमध्ये एवढ्या सिक्स मारण्याचा हा विक्रम आहे. याआधी गेलच्याच नावावर हा रेकॉर्ड होता. आयपीएलच्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना गेलनं १७ सिक्स मारल्या होत्या.

शतकांचंही रेकॉर्ड

बांग्लादेश प्रिमिअर लीगच्या फायनलमध्ये ढाका डायनामाईट्सविरुद्धच्या मॅचमध्ये गेलनं ६९ बॉल्समध्ये १४६ रन्सची खेळी केली. टी-20 क्रिकेटमधलं गेलचं हे २०वं शतक आहे. टी-20 क्रिकेटमध्ये एवढी शतकं मारणारा गेल हा एकमेव खेळाडू आहे.