ख्रिस गेलचे कमबॅक, दोन वर्षांनंतर विंडीज टी -20 संघात

आंतराष्ट्रीय खेळाडू आणि वेस्ट इंडिजचा (West Indies) आक्रमक खेळाडू ख्रिस गेल (Chris Gayle) याने टीममध्ये कमबॅक केले आहे.  

Updated: Feb 27, 2021, 05:45 PM IST
ख्रिस गेलचे कमबॅक, दोन वर्षांनंतर विंडीज टी -20 संघात   title=
वेस्ट इंडिज खेळाडू ख्रिस गेल (Reuters/File Photo)

मुंबई : आंतराष्ट्रीय खेळाडू आणि वेस्ट इंडिजचा (West Indies) आक्रमक खेळाडू ख्रिस गेल (Chris Gayle) याने टीममध्ये कमबॅक केले आहे. दोन वर्षानंतर त्यांचे कमबॅक झाले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ (West Indies team) अधिक मजबूत झाला आहे. ख्रिस गेलने टी-20 सामन्यात तुफान फलंदाजी केली आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात टी-20 क्रिकेट विश्व चषक (T20 Cricket World Cup) होणार आहे. याची तयारी आता वेस्ट इंडिजने केली आहे. संघाची निवड केली आहे. या संघात ख्रिस गेल याचा समावेश करण्यात आला आहे.

 भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात टी-20 क्रिकेट विश्व चषक होणार आहे. टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीममध्ये तगडा खेळाडू ख्रिस गेल याचा (Chris Gayle) समावेश करण्यात आला आहे. गेल याने वयाच्या 41 व्या वर्षी 18 महिन्यानंतर वेस्ट इंडिज संघात पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज अशी त्याची ओळख आहे. ख्रिसने 2019मध्ये इंग्लंड विरुद्ध शेवटची टी-20 सामना खेळला होता. या सामन्यात त्याने चार चेंडूनत फक्त पाच धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. मागील 18 महिन्यांमध्ये ख्रिस गेले याने वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने अर्धशतक आणि शतक झळकावळीत आहेत.

ख्रिस गेल याने 2006 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 58 आंतरराष्ट्रीय सामन्यात 32 च्या सरासरीने आणि 142 च्या स्ट्राईक रेटने 1627 धावा केल्या होत्या. यात दोन शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.

श्रीलंकेविरुद्ध तीन मार्च ते सात मार्च या दरम्यान तीन सामन्यांची टी-20 क्रिकेट मालिका होणार आहे. के. पोलार्ड (Kieron Pollard) या टीमचा कर्णधार आहे. तर निकोलस पुरन (Nicholas Pooran) उपकर्णधार आहे. यावर्षी होणारा टी-20 विश्व चषक क्रिकेटच्या तयारीसाठी ही स्पर्धा वेस्ट इंडिजसाठी महत्त्वाची आहे. या टीममध्ये अनेक अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.  

वेस्ट इंडिजचा टी-20 संघ : 

कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फेबियन एलन, ड्वेन ब्राव्हो, फिडेल एडवर्डस, ख्रिस गेल, जेसन होल्डर, एव्हिन लुईस, ओबेद मॅककॉय, रोवमॅन पॉवेल, लेंडल सिमन्स, केव्हिन सिनक्लेयर