World Cup 2023 : पुढचा World Cup भारतामध्ये खेळला जाणार; जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये?

T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर (MCG) पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे 

Updated: Nov 13, 2022, 11:54 AM IST
World Cup 2023 : पुढचा World Cup भारतामध्ये खेळला जाणार; जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये?  title=

World Cup 2023 : ICC T20 विश्वचषक 2022 च्या सेमीफायनलमध्ये 10 गडी राखून पराभूत झाल्यानंतर भारताची मोहीम संपुष्टात आली. T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर (MCG) पाकिस्तान आणि इंग्लंड (Pak vs Eng) यांच्यात होणार आहे. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अखेर अपयश आले आहे. आता पुढील ICC T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाला 2024 ची वाट पाहावी लागणार आहे. कारण पुढील T20 विश्वचषक वेस्ट इंडिज (West Indies) आणि USA मध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे. पण त्याआधी पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये भारताला (India) आणखी एक विश्वचषक खेळण्याची संधी मिळेल आणि तीही मायदेशावर... 

पुढील आयसीसी क्रिकेट विश्वचषक येत्या वर्षात म्हणजे 2023 मध्येच होणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच संपूर्णपणे भारताकडून याचे यजमानपद मिळणार आहे. 1987, 1996 आणि 2011 हे तीन विश्वचषक सामने भारताने संयुक्तपणे आयोजित केले होते. तर 2023 मध्ये हा विश्वचषक सामना एक दिवसीय फॉरमॅटमध्ये म्हणजेच 50 षटकांमध्ये खेळायला जाणार आहे. 2023 च्या ODI कप मध्ये एकूण 10 सहभागी संघ असणार आहे. 2023 मध्ये नोव्हेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा मागील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेप्रमाणे राऊंड-रॉबिन (Round-robin) आणि नॉक-आऊट (Knock-out) या स्वरूपामध्ये खेळली जाईल. दरम्यान 2020-23 सुपर लीग स्पर्धेच्या गुणसरणीनुसार 10 संघ या स्पर्धेमधील असतील.   

वाचा : Twitter Blue Tick संदर्भात मोठी बातमी, Elon Musk ची ट्वीटवर पुन्हा नवी घोषणा! 

ही स्पर्धा पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि ती मागील एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणे राऊंड-रॉबिन आणि नॉक-आउट स्वरूपात खेळवली जाईल. 2020-23 सुपर लीग स्पर्धेच्या गुण सारणीनुसार 10 संघ निश्चित केले जातील. जेथे शीर्ष 7 संघ आणि यजमान भारत थेट पात्र ठरतील. उर्वरित दोन ठिकाणे झिम्बाब्वे येथे जून-जुलै 2023 मध्ये होणाऱ्या 2023 विश्वचषक पात्रता फेरीद्वारे निश्चित केली जातील. सुपर लीग टेबलमधील उर्वरित पाच संघ 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात 9व्या आणि 10व्या स्थानासाठी लढण्यासाठी पाच समर्थनीय संघांमध्ये सामील होतील.

दुसरीकडे आयपीएल 2023 (IPL 2023) साठी बीसीसीआय (BCCI) ने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपले रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व फ्रेंचाईजींनी आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शनचे नियोजन सुरू केले आहे. क्रिकबज वरून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व संघांचे याद्या तयार झालेल्या असून त्यांची अंतिम पुष्टी होणे बाकी आहे. त्याचबरोबर अनेक फ्रॅंचाईजी आपल्या संघाचे कॅप्टन (Captain) बदलू शकता अशी देखील माहिती बाहेर येत आहे.