Rishabh Pant च्या करिअरला 25 वर्षीय खेळाडूपासून धोका; कोण आहे 'तो' रोहितच्या मर्जीतला माणूस?

Rishabh Pant Comeback : भारतीय संघातील खेळाडू ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर नेमका कधी परतणार याचीच उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागलेली असताना आता संघातील त्याची जागा घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: Aug 9, 2023, 12:00 PM IST
Rishabh Pant च्या करिअरला 25 वर्षीय खेळाडूपासून धोका; कोण आहे 'तो' रोहितच्या मर्जीतला माणूस? title=
cricket news wicketkeeper Rishabh Pant gettig tough fight for the place by ishan kishan

Rishabh Pant Comeback : मागील वर्षी डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत याचा भीषण अपघात झाला. या अपघातातून पंतला गंभीर दुखापत झाल्यामुळं त्याला यातून सावरण्यासाठी बऱ्याच महिन्यांचा कालावधी लागला. किंबहुना अद्यापही पंत संघात सहभागी होऊ शकला नसून, तो दुखापतीतून सावरण्याच्या प्रयत्नांत आहे. पण, ज्याप्रमाणं Show must go on असं म्हणतात त्याचप्रमाणं पंतच्या अनुपस्थितीतही त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करत भारतीय क्रिकेट संघ विविध स्पर्धा आणि मालिकांमध्ये सहभागी होताना दिसत आहे. 

सध्याच्या घडीला पंतच्या जागी या युवा खेळाडूनं स्वत:चं स्थान पक्कं केलं असून, आता अनेक जाणकारांच्या मते संघात स्थान भक्कम करण्यासाठीच त्याचे हे सर्व प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. हा खेळाडू म्हणजे ईशान किशन (ishan kishan). मुळात हे दोन्ही खेळाडू एकमेकांचे चांगले मित्र, इतकंच नव्हे तर त्यांच्या खेळण्याच्या शैलीतही ही झलक दिसून येते. 

ईशान- ऋषभमध्ये मैत्र की स्पर्धा?

नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजसोबतच्या सामन्यांमध्येही ईशाननं पंतसारख्याच खेळाचं प्रदर्शन केलं. एकिकडे Wicket Keeping ची जबाबदारी लिलया पेलत दुसरीकडे त्यानं एसदिवसीय सामन्यांमध्येही चांगलं प्रदर्शन केलं. सलग तीन सामन्यांमध्ये त्यानं अर्धशतकी खेळी केल्यामुळं निवडत समितीचंही लक्ष वेधलं. थोडक्यात ईशान किशन सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता ऋषभ पंतच्या संघातील पुनरागमनासाठी अडचणी निर्माण होण्याची चिन्हं आहेत. 

रोहितच्या मर्जीतला माणूस...

क्रिकेटप्रेमी आणि काही क्रिकेट जाणकारांच्या मते रोहित शर्माच्या मर्जीतील खेळाडूंच्या यादीतही ईशान किशनच्या नावाचा समावेश होतो. ज्यामुळं संघात Wicketkeeper आणि फलंदाज म्हणून कायमस्वरुपी स्थान मिळावं यासाठीही तो प्रयत्न करताना दिसत आहे. ज्यासाठी ईशान रोहित शर्माच्या आजुबाजूला सातत्यानं वावरताना दिसतोय, असं अनेकांचं निरिक्षण. इथं कर्णधाराशी चांगलं नातं जपणारा ईशान तिथं प्रशिक्षकपदी असणाऱ्या राहुल द्रविड याच्यासोबतही बराच वेळ व्यतीत करत असल्यामुळं येत्या काळात त्याला संघात कायमचं स्थान मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. 

हेसुद्धा वाचा : 'हार्दिक पांड्यासारखा स्वार्थी खेळाडू पाहिला नाही'; 'त्या' एका कृतीमुळे चाहते संतापले; VIDEO पाहून तुम्हीच ठरवा

आशिया चषकासाठी लागू शकते ईशानची वर्णी... 

अवघ्या 25 वर्षांच्या वयात ईशान किशननं आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं असून, मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. त्यामुळं येत्या काळात आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठीही त्याची वर्णी लागण्याची शक्यत आहे. त्याच्या येण्यानं ऋषभ पंतच्या क्रिकेट कारकिर्दीला धक्का लागू शकतो ही शक्यता मात्र नाकारता येत नाही.